लोकसभा निवडणूक २०१४ - निकाल आणि त्याचा अर्थ

भाजपच्या विजयात नेमका वाटा कुणाचा - मोदी factor की कॉंग्रेसविरोधी भावना की आणखी काही --- हा प्रश्न बर्यापैकी संकुचित चौकटीतून बघितल्या जातोय. गेल्या ३-४ वर्षात वेगवेगळ्या स्तरातून, माध्यमातून भारतीय समाजकारण आणि राजकारण ज्या प्रकारे घुसळून निघालं आहे त्यावरून "ह्यात नवल ते काय" असं वाटावं असाच निकाल आहे. जर सगळ्याच गोष्टींचा विचार केला तर "असा निकाल लागणं साहजिक होतं" असं वाटायला लागतं. परंतु भारतात निवडणुकीचे निकाल अनेकदा विचित्र लागतात. त्यामुळे सगळ्यांना वाटत जरी होतं तरी भाजपा इतकी मोठी मजल मारू शकेल की नाही ह्याची शाश्वती नव्हती. आणि म्हणून ह्या निकालांचं कौतुक ! प्रत्येकवेळी कुठल्या तरी पोकळ भीतीपोटी (साम्प्रदाईक ताकद वगेरे!) किंवा युजलेस आमिषापोटी जनता मत देण्यात घोळ करायची...म्हणून जरा धाकधूक होती. सुदैवाने तसं काही झालं नाही. असो.

मोदींचा गुजरात विकास, कॉंग्रेसचा भारत भकास...ह्या एका सूत्रात जरी १६ मे च्या दिवसाची गुपितं असतील तरी ह्या इक्वेशन मध्ये बरेच व्हेरीयेबल्स आहेत. आणि ह्यात केवळ संघच नाही...इतरही काही महत्वाचे अंश आहेत.

गेल्या ३-४ वर्षात रामदेवबाबांनी अक्खा उत्तर भारत स्वदेश, भारतीय संस्कृती, गौ-हत्या इ मुद्द्यांवर ढवळून काढलाय. राजीव दीक्षितजींचे यू-ट्यूब व्हिडीओज भरपूर व्ह्यूज खेचताहेत. सुब्रमण्यन स्वामींचं कोर्ट कार्य बराच अवेयरनेस करत होतं. ह्या सगळ्यांनीच कॉंग्रेसविरोधी सूर अधिकाधिक बळकट होत गेला.

भाजप विजयात सिंहाचा वाटा उचलला आहे - आम आदमी पार्टी ने !

आधी इंडिया अगेन्स्ट करप्शन चं आंदोलन आणि नंतर "आपा" ने आपल्या तरुण भारतचं राजकीय interaction खूप वाढवलं. (AAP ला देवनागरीत "आप" नं म्हणता "आपा" म्हणावं - कारण ते आम आदमी "पार्टी" आहेत..."पक्ष" नाही...असं काही कट्टरलोकांचं मत आहे...म्हणून...आपा ! ;)  असो !) अनेक तरुण आणि त्याहूनही अधिक मध्यमवयीन भारतीय नागरिक, जे राजकारणाशी केवळ मतदानापुरते संबंधित होते, प्रामुख्याने भारतीय महिला - ज्यांचा राजकारणाशी "आमच्या ह्यांनी *****चं बटन दाबायला सांगितलं, म्हणून मी दाबलं" इतकंच सोयरसुतक होते....असे अनेक अनेक भारतीय नागरिक जनलोकपाल आंदोलन आणि आपाच्या जन्मामुळे बर्यापैकी जागरूक झाले. दिल्लीत काय काय घडतंय लक्ष द्यायला लागले. ह्याचीच परिणीती केवळ काय घडतंय ह्याच्या पुढे जाऊन "हे चांगलं घडतंय की वाईट" हा विचार करण्यात झाली. स्वातंत्र्योत्तर काळात "दिल्लीत काय घडतंय" ह्याबद्दल एवढी जागरूकता जनता पार्टीच्या नंतर आत्ताच घडली असावी. --- सोशल मिडिया हा ह्या factor ला सपोर्टिंग असा उप-factor होता.

मोदींची प्रचंड कार्यक्षमता, अमित शहांचा राजकीय डावपेचांचा दांडगा अनुभव, अनेक कॉर्पोरेट हौजेसचा मोदींना 'अर्थ'पूर्ण पाठींबा, संघ परिवारचं मजबूत नेटवर्क, कॉंग्रेसचा भोंगळ कारभार आणि त्याहून भोंगळ निवणूक नियोजन आणि सोशल मिडियामुळे घरोघरी - मोबाईल-मोबाईलवर पोकळ गमजा नं पोहोचता खरी माहिती पोहोचणं - हे सगळे डायरेक्ट factors काम करू शकले ते वरील आणि वर नसलेल्या अनेक in-direct factors मुळे.

======

भाजप यशाची "कारणं" जी काही असोत...परंतु ह्या निवडणूक निकालाने काही फार उत्तम गोष्टी सूर्यप्रकाशासारख्या स्पष्ट झाल्यात.

१) भारतीय मतदार इतका काही "हा" नाहीये. जेव्हा "चांगला" पर्याय "अव्हेलेबल" असतो - तेव्हा ते बरोबर त्याची निवड करतात. कुणी पर्यायच नसेल तर ... मग काय...पर्यायच नाही ! :)
२) "भारतीय मतदार जाती-धर्माच्या आधारावर मतदान करतो" हे जे जे प्रकांडपंडित बोम्ब्लायचे - त्यांच्या सणसणीत मुस्काडात बसली आहे.
३) "भारतीय मतदार पैसा घेऊन, दारू घेऊन मतदान करतात" -  हे जे जे प्रकांडपंडित बोम्ब्लायचे - त्यांच्यासुद्धा सणसणीत मुस्काडात बसली आहे.
४) भारतीय मतदार फुकटच्या भूलथापांना बळी पडतो हा मोठ्ठा भ्रम - किमान आजच्या पिढीने तरी खोटा पडलाय. परत एकदा - सणसणीत मुस्काडात !

५) सगळ्यात महत्वाचं - काल परवा राजकारणात उतरलेल्या बच्चेकंपनीला देशाची सार्वभौम संस्था हाताळायला देण्याचा "केसाइतका"ही विचार आमच्या मनात नाही - हा अत्यंत सजग, जागरूक, वेल-एज्युकेटेड मेसेज अत्यंत मजबूतपणे देण्यात भारतीय मतदाराने जराही कुचराई केलेली नाही. ह्या निवडणुकीच्या निकालाचं हे सगळ्यात महत्वाचं अंग आहे. आमचे भारतीय नागरिक लोकल बॉडीज, राज्यसरकार आणि केंद्रसरकार - ह्यातला फरक, त्याचा त्याचा सिरीयसनेस चांगलाच ओळखून आहेत - हे सुरेखरित्या स्पष्ट झालंय आता. "आपा कंपनी" खूप चांगली आहे असं गृहीत धरूनही - केंद्राचा राज्यकारभार करण्यासाठी आधी स्थानिक संस्था चालवणे, तिथल्या समस्या सोडवणे, एखाद-दुसरं राज्य चालवणे आणि मग दिल्लीची स्वप्न पाहणे - हेच आपासाठी आणि देशासाठी श्रेयस्कर !
===

भारतीय मतदाराचा विजय असो !
Indian Voters...Super Like !
वंदेमातरम् !

No comments:

Post a Comment