गांधी-गोडसे-सावरकर...वाद कधी संपणार?


गांधी-गोडसे-सावरकर ... ह्यांमध्ये कोण किती योग्य होतं...कुणी काय केलं...का केलं ह्यावर आपण किती वेळ विचार आणि वाद घालावा? ह्याला... आपण...किती महत्व द्यावं?

हे तिघेही त्यांनी केलेल्या कामामुळे आम्हाला, कमी अधिक फरकाने, मोठे वाटतात. कदाचित कुणाला गांधी तर कुणाला गोडसे...मोठे वाटणार नाहीत. मूळ विचार आणि कृती...त्या मागची भूमिका...ह्यावर दुमत असू शकतं.

त्यांनी केलेल्या कृती "योग्य विचाराने" प्रेरित होत्या की नाही...ह्यावर वाद होऊ शकतो.

परंतू कुठली विचारप्रणाली योग्य ह्यावर दुमत नसावं...! गांधींनी दिलेला अहिंसेचा संदेश कुणाला एकांगी वाटत असेल कदाचित. गांधीहत्या देखील चूक वाटू शकते. पण त्या दोन्ही मागची "भावना" कशी असेल तर ती कृती योग्य...ह्यावर जर एकमत झालं... जे होणं मला फार कठीण वाटत नाही... तर वादाचा विषय उरतो का?

गांधी-गोडसे-सावरकर...योग्य की अयोग्य, महात्मा की दुरात्मा...ह्या चर्चेपेक्षा...त्यांच्या वैचारिक मंथनातून आपण काय शिकू शकतो, कुठली भूमिका... (कुठली...कुणाची नव्हे...कुठली!!!) योग्य असू शकते हे जर कळलं तर झालं ना?

आपण आज ते तेवढं शिकून बाकीचा उहापोह बाजूला नाहीका ठेऊ शकत?

उरलेला वेळ आजची परिस्थिती सुधारण्यावर नाही का लाऊ शकत? ते अधिक महत्वाचं नाहीये का?

No comments:

Post a Comment