जागे व्हा...बदल घडवा...क्रांती आणा...!!!

lolz...काळजी नका करू! मी भारतातल्या भ्रष्टाचार, घुसखोरी, महागाई इ इ बद्दल आरडा-ओरड करणार नाहीये. मी अशी आरडओरड करणाऱ्यांबद्दल बोलणार आहे. ;)

भारतातल्या सद्यपरिस्थिती बद्दल असा राग असणं, वैताग असणं अगदी स्वाभाविकच आहे. नव्हे...तसा वैताग नसेल तर आमची तरुण पिढी थंड रक्ताची आहे असंच म्हणावं लागेल! आणि तसं नाहीये...! किमान फेसबुक, ट्वीटर, निरनिराळे ब्लॉग्स...असं "Online activism" आम्ही फार हिरीरीने करतोय!! आमचं गरम रक्त असं Online फार तावातावाने उसळतं! शिरा ताणून ताणून (डोळ्यांच्या आणि हाताच्या ;) ) चर्चा घडतात...निरनिराळ्या पक्षाचे, विचारधारेचे तरुण आपलं म्हणणं पटवण्याचा, ठसवण्याचा प्रयत्न करतात...

आणि बदल घडवण्याचा प्रयत्न करतात...
जागे व्हा...बदल घडवा...क्रांती आणा...!!!

मला प्रश्न पडतो की ह्या चर्चा खरंच कुणाची मतं बदलण्यात, सुधारण्यात यशस्वी होत असतील का? मी तरी आजपर्यंत कुणी कॉंग्रेसवाला चर्चेनंतर भाजप/शिवसेनावाला बनला किंवा..."कुणीच नाही-सगळेच चोर आहेत"...असं बदललेला नाही बघितला. राजकीय पक्ष जाऊद्या... अण्णा हजारे वाले...आणि त्यांचे विरोधक...ह्यांच्यातही चांगलीच जुंपत असते! कधी कुणी आपापल्यापरीने, "मोठा" विचार करून आपलं मत बदललं...असं फारच क्वचित घडतं! मग उपयोग काय होतो अश्या चर्चांचा???

मत बदलत नाही...आणि त्याहून महत्वाचं...कृतीही घडतंच नाही!
सर्वच जण नुसते बोंबलत बसतात!

काही लोक खरोखर कृती घडवायचा प्रयत्न करतात. पण त्यांची कृतीदेखील मला बुचकळ्यात पाडते. असं वाटतं की "ह्या" कृतीने काय होणार?!!
काय असतं ह्यांचं म्हणणं?
"शिवाजीमहाराज नुसते गप्पा मारत बसले असते तर काय झालं असतं?...तुम्ही चांगले नागरिक बना...बाकीच्यांना चांगले नागरिक बनवा...आपापल्यापरीने समाजप्रबोधन करा...इ इ"
वरील भूमिका चुकीची नक्कीच नाही!!! आपण सगळ्यांनीच चांगलं नागरिक असणं हे आपलं प्रथम कर्तव्य! आणि इतरांना चुकांपासून परावृत्त करणं हे दुसरं! हे करायलाच हवं!!

पण शिवाजी महाराज असं करत बसले का? की सावरकर? की भगतसिंग?
"आपण चांगलं बना, आपल्या पासून सुरुवात करा, समाज चांगला बनवा..." ही भूमिका चांगली असली तरी ही समस्येचं समाधान देत नाही!! "सगळा किंवा बहुतांश समाज चांगला बनेल"..."अश्या" पद्धतीने चांगला...ही एक "Perfectly Utopian Society" असू शकते...अशी भाबडी अपेक्षा केल्यासारखं आहे!

वास्तविकतः, सामान्य लोक "मुळात" चांगलेच असतात. त्यांना वाईट बनावं लागतं...एक तर खाजगी अडचणींमुळे...किंवा आजूबाजूच्या परिस्थितीमुळे. त्यांना "चांगले बना" हे सांगायची गरज नाही...गरज आहे त्यांना चांगलं बनता येईल अशी परिस्थिती निर्माण करण्याची...आणि ती..."सामुहिक प्रयत्नाने" बनेल!!! आणि त्यासाठी कुणीतरी पुढाकार घेऊन...काही मोजक्याच लोकांचा समूह---संघटन बनवून तसे प्रयत्न करावे लागतील.
तसं नं करता...समाजातले प्रश्न सुटण्याची अपेक्षा करणं म्हणजे..."श्रीराम" व्हायला नकोय...पण "रामराज्य" तर हवंय...!!!

शिवाजीराजे असोत की लोकमान्य...ह्या लोकांनी "रस्त्यावर उतरून" काम करूशकतील अश्या मोजक्याच लोकांना हाताशी धरून परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. एक-एक गड...एक एक समस्या...हाती घेऊन तिचा फडशा पाडला. पण आज आमचे बरेच लोक अश्या समस्यांच्या फक्त "प्रचार" करण्यावर भर देतात...!
आणि परत..."जागे व्हा...बदल घडवा...क्रांती आणा...!!!"

उदाहरण द्यायचं तर नुकतच Chief of Army Staff, General VKSingh, ह्यांनी पंतप्रधानाना लिहिलेलं पत्र...ते बाहेर मिडीयाला कळणं हे प्रकरण. मूळ समस्या सर्वाना माहित आहे...आणि तरी त्या बातमीच्या लिंक वर लिंक सगळीकडे टाकायच्या आणि ओरडत बसायचं..."आग की तरेह फैलावो...! आंधी लावो...!!!"

आपली सेना आज नाजूक अवस्थेत आहे...आणि ते तसं सरकारमुळे झालंय...फक्त कॉंग्रेसच नाही...आधी आलेल्या प्रत्येक सरकारने कुठल्या ना कुठल्या प्रकारे देशाचे, संरक्षण व्यवस्थेचे लचके तोडलेच आहेत. आणि हेच आम्ही गेल्या आठवडाभर एकमेकांना सांगत सुटलोय! ह्याला काय फार अक्कल लागते का? की इतरांना हे माहित नाही? उगीच आपलं जहाल लिहीत बसायचं...!
"Like" आणि "Comment" च्या हव्यासापोटी!

Solution कुणी देत नाही...!!!

आणि जर कुणी Solution देतंय...तर त्यावर चर्चा घडतंच नाही!!...योग्य प्रतिसाद अजिबात दिला जात नाही!! मग त्यावर कृती तर दूरच!!!
अश्याने काय होणार? आज सोनिया आहे...उद्या कुणी दुसरं असेल...! आज जर फक्त प्रश्नावरच चर्चा करत बसलो आणि शिव्याच देत बसलो तर प्रश्नामागची मूळ कारणं, आणि त्यावरचे उपाय कधी शोधणार? कोण शोधणार? त्यावर कृती कधी करणार? आणि कृती करायचं ठरलं...तर "योग्य" कृती कुठली हे कधी ठरवणार!???
समस्येचं समाधान शोधून त्यावर काहीतरी करणं महत्वाचं...आणि "योग्य" ते करणं त्याहून महत्वाचं!!!

नाहीतर प्रत्येक प्रयत्न, प्रत्येक आंदोलन अण्णांच्या जनलोकपाल सारखं...एखादं हसं होऊन बसतं...आणि मग ज्यांची काही विधायक कार्य करण्याची इच्छा आहे, "परिस्थिती सुधारू शकते" असा विश्वास ज्यांना आहे...ते सुद्धा उत्साह गमावून बसतात.

पण माझे जाज्वल्य देशाभिमान असणारे, प्रखर विचार असणारे मित्र हे समजूनच घेत नाहीयेत...
आणि काही फक्त चर्चा करण्यात...तर काही "रामराज्य"च्या स्वप्नात गुंग आहेत!!! :(

2 comments:

 1. नेहमीप्रमाणे योग्य आणि परखड मत व्यक्त केले आहेस.
  मला ही वाटते की काही करावे,पण आपण विचारी माणसे असल्यामुळे योग्य संधीची वाट बघतो.
  "रंग दे बसंती" सारखे आपण विचार केला तरी त्याचा शेवट आपला होईल,
  त्यासाठी क्रांती/जागृती करावीच लागेल.
  आधीच्या लोक हे निडर होते,आपण नाही हे कटू सत्य आहे.
  आपली संवेदना संपल्या आहेत,जे करतात ते ही काही स्वार्थ आहे म्हणून(काही अपवाद आहेतच).
  आपण आता जे काम हाती घेतले आहे.विशालगडाचे त्यासाठी तन-मन लाऊया..
  सुरवात करूयात....
  ठिणगी नाही पडली तर आग लागत नाही आणि लाकूड ओले असेल तर ठिणगीचा उपयोग नाही...
  आता आपण लाकडाला धग देऊया..म्हणजे जेव्हा गरज लागेल तेव्हा आग लागलीच पाहिजे..

  ReplyDelete
  Replies
  1. Amit....

   "रंग दे बसंती" होऊच शकत नाही! अगदी बरोबर!

   पण स्वदेस आणि युवा होऊ शकतात!!! आंदोलनं होऊ शकतात...! तुमचा मार्ग चूक आहे असं नाही...पण "मोठं" काही त्याने साध्य होणं शक्य नाही असं वाटतं. आपण आपल्या तन-मन-धनाने जे काय करू ते किती दिवस पुरणार? परत वर्ष-सहा महिन्याने तेच? आणि बाकी गडांचं काय? किती गड आपण सांभाळणार?

   गड आहेच...पण इथे कितीतरी सजीव...जिवंत लोक आहेत ज्यांना मदतीची गरज आहे...साध्वीजी सारख्यांसाठी लढण्याची गरज आहे...ते का नाही करत आपण? हिंदवी स्वराज्य सेना आपण होऊन एकटी असं नसेल करू शकत तर इतर अश्या संघटनांना एकत्र आणून का नाही करण्याचा प्रयत्न करायचा?

   एक लक्षात घ्या...जर अश्या मुद्द्यावर आपण पेटून उठलो तर आणि तरच जगात संदेश जाईल की आपण झोपलो नाही आहोत. कच्च्या गुरुचे चेले नाही आहोत. आज हाच संदेश जाणं महत्वाचं आहे.

   बाकी...आपण सुज्ञ आहात!!!

   Delete