गांधीजी---शंका व समाधान (भाग १)

फेसबुकवर अनेक विषयांवर घडलेल्या अनेक चर्चा मी अनुभवल्या आहेत. बऱ्याच चर्चांमध्ये हिरीने सहभागही घेतला आहे. त्या सर्व चर्चांमध्ये उजवी वाटलेली आणि..."आपण बस्स वाचत राहावं...!! ही चर्चा संपूच नये...!!" असं वाटावं अशी एका गांधी विरोधक (आधी गांधी समर्थक...पण नंतर विरोधक झालेला माझ्यासारखाच एक अभ्यासू) आणि (वयाने, अभ्यासाने खूप वरिष्ठ असलेले) गांधी समर्थक ह्यामध्ये घडलेली ही चर्चा.


Anupam Kambli ने गांधीजींबद्दल आपल्या सर्वांच्याच मनात असलेले काही प्रश्न एका मोहनदास करमचंदगांधीँविषयी मला पडलेले काही प्रश्न... अश्या मथळ्याच्या फेसबुकनोट मध्ये विचारले. आणि त्या प्रश्नांना Ajit Pimpalkhare सरांनी उत्तरं दिली. ही सगळी चर्चा एवढी मस्त जमलीये...की माझ्या सगळ्या अभ्यासू मित्रमैत्रिणींना ती लिंक द्यावीशी वाटली. पण विचार केला,  त्या दोघांनी परवानगी दिली तर ती चर्चा वाचायला सोप्या प्रकारे माझ्या ब्लॉग वर टाकता येईल. त्यांनी, अर्थातच, मोठ्या मनाने परवानगी दिली. तीच ही चर्चा !!


अनुपम:- 

हल्लीच अजित पिँपळखेरे सरांना मी गांधीजीँविषयी माझे काही आक्षेप कळवले होते आणि अर्थातच माझ्यापेक्षा त्यांचे या विषयावर वाचन खुप असल्यामुळे त्यांनी त्यांचा एक जबरदस्त लेख मला वाचायला दिला. लेख अतिशय सुंदर होता पण अगदीच स्पष्ट सांगायच तर काही ठिकाणी सरांचे युक्तिवाद देखील पटत नाहीत. माझे गांधीजीँबद्दल जे काही आक्षेप किँवा शंका आहेत त्या मी आता या लेखात मांडत आहे.

1) गांधीजीँचा नथुराम गोडसेँनी वध केला त्याला प्रमुख कारण होते की,

"गांधीजीँनी स्वातंत्र्यानंतर भारताने 55 कोटी रुपये पाकिस्तानला द्यावे असा हट्टाग्रह केला होता. त्यावेळी सरकारमधल्या नेत्यांचा पण या गोष्टीला विरोध होता तरी गांधीजीँनी आमरण ...उपोषण करुन 55 कोटी रुपये पाकिस्तानला देण्यास भाग पाडले."
या आक्षेपाला पिँपळखेरे सरांनी दिलेल उत्तर आश्चर्यचकित करणार वाटल. त्यांच्या मते गांधीजीँनी 55 कोटीँसाठी आमरण उपोषण केलच नव्हतं. देशात जे दंगे चालु होते ते थांबावेत आणि देशात शांतता नांदावी यासाठी ते उपोषण होत.
सरांच्या विधानावर विश्वास ठेवायचा तर या 55 कोटीँबद्दल त्यावेळी बोँबाबोँब करणारे सावरकर, नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे सारख्यांना आपण काय म्हणाव...?
त्यांना ही गोष्ट माहितच नव्हती का...??
की सावरकरांसारखा नेता ही गोष्ट माहित असुन जनतेची दिशाभुल करत होता...???
जर गांधीविरोधकांकडे गांधीँच्या या उपोषणाबद्दल काही पुरावा असल्यास त्यांनी तो सादर करावा म्हणजे पिँपळखेरे सरांना विश्वास बसेल की गांधीँच उपोषण 55 कोटीँसाठीच होत.
उत्तर:-
हे ५५ कोटी काय आहेत हे जरा समजून घ्या.स्वातंत्र्याच्या वेळी बिटीश भारताचे assets आणि liabilities हे ४:१ या रीतीने वाटले गेले. अगदी दिल्लीच्या सरकारी कचेरीतली टेबल -खूर्च्यासुध्दा. हया सगळ्या वाटाघाटी सरदार पटेल आणि लियाकत अली खान जे पुढे पाकिस्तनचे पंतप्रधान झाले. याच्याशी महात्मा गांधीचा संबध नव्हता.महात्माजी यातला बहुतेक काळ दिल्लीतही नव्हते.आफळेबुवांनी सरदार आणि महात्मा यांच्या मधले जे संभाषण दिले आहे ते धडधडीत खोटे आहे .हे संभाषण लियाकत अलि खान आणि सरदार पटेल यांच्यामध्ये झाले होते.
या वेळेला भारतीय रिझर्व्ह बंकेच्या हातातली रोकड रक्कम भारताला ३०० कोटी आणि पाअकिस्तानला ७५ कोटी अशी विभागली. त्यापैकी २० कोटी पाकिस्तानला फाळणीच्या आधी दिले आणि बाकीचे ५५ कोटी फाळणीनतर लगेच देण्याच्या करारावर सह्या झाल्या.
कांग्रेस सरकारने पाकीस्तानला देण्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये जितकी चालढकल करता येईल ,ज्या गोष्टी देण्याचे टाळता येईल ते टाळणे,तोफा दिल्या तर दारुगोळा न देणे इ. . आपल्या राष्ट्राला योग्य असलेल्या सगळ्या खेळी खेळल्या. १५ आगस्ट १९४७ ते जानेवारी १९४८ पर्यंत पाकीस्तानी बोंबलत होते ५५ कोटीसाठी,आणि भारत ,पाकिस्तान या दोन्ही ठीकाणी ब्रिटिश अधिकारी होते.
या सगळ्या घडामोडींशी महात्माजींचा दूरान्वयानेही संबध नव्हता.

महात्मा गांधीनी जुनागड ,बाबरीवाड ,काश्मीर या ठिकाणी भारताने सैन्य पाठविले याबद्दल निषेध अथवा उपास केला नाही उलट श्री. चोयतराम यांच्या नेतृत्वाखाली त्यांना ३० जानेवारी १९४८ [त्यांच्या खूनाच्या दिवशी] सकाळी भेटायला आलेल्या सिंधी समुहाला त्यांनी सांगितले " जर काश्मिरी लोकांच्या हक्कासाठी सैन्य वापरले जाउ शकते तर हिंदु सिंध्याच्या हक्कासाठी सैन्य का नाही वापरले जाणार,अवश्य वापरले जाईल." ही बाब श्री.के.आर.मलकानी ,जे “Organiser” संपादक आणि भाजपाचे उपाध्यक्ष होते त्यांनी आपल्या आत्मचरीत्रात नोंदवली आहे,भारत सरकार अथवा कांग्रेसने नाही

महात्माजींनी उपवास हा दिल्लीतल्या दंगली थांबाव्या या साठी केला ,५५ कोटीसाठी नाही. त्यांच्या उपासाची कारणमिंमासा खालील आहे.

Gandhiji’s own announcement about his resolve on 12th January in the evening prayer meeting did not contain any reference to it. Had it been a condition, he was bold and frank enough to have certainly mentioned it as that.
Similarly, there was no reference to it in his discourse on 13th January.
Gandhiji's reply on the 15th January, to a specific question regarding the purpose of his fast did not mention even mention 55 crores.
The press release of the government of India did not have any mention thereof.
The list of assurances given by the committee headed by Dr. Rajendra Prasad to persuade Gandhiji to give up his fast did not include it.

भारत सरकारने ५५ कोटी देण्याचा निर्णय १५ जानेवारी १९४८ ला जाहीर केला तरीही गांधीजींनी उपास थांबविला नाही.१८ जानेवारी १९४८ ला जेव्हा दिल्लीतल्या सर्व धर्माच्या राजकीय आणि सामाजीक संघटनांनी दंगली थांबवण्याचे लिखीत आश्वासन दिले [यात RSS आणि हिंदु महासभापण होत्या] तेंव्हा गांधीजींनी आपला उपास सोडला.

एक महत्वाची बाब जी सदैव डोळ्याआड केली जाते ती म्हणजे महात्माजी पाकिस्तानातले दंगे थांबवायला १० फ़ेब्रुवारीला लाहोरला जाणार होते.
त्यांनी एक पेच पाकिस्तान सरकारपुढे जाहीर रित्या टाकला होता की " मी पाकिस्तानला वेगळा देश समजत नाही ,तिथे जायला मला पाकिस्तान सरकारच्या परवानगीची जरुरी नाही,मी जाणार आणि मला कोण अडवतो ते बघू.याचा फायदा घेऊन धूर्त सरदार पटेलांनी जगाला सांगितले की ५५ कोटी आम्ही महात्माजींच्या इच्छेसाठी देतो आहोत,अशा या महात्मायला आपण का थांबवता.
अर्थातच नथूरामने पाकिस्तानचा हा प्रश्न सोडवला .

2) सरदार पटेलांनी गांधीजीँना सांगितल जर 55 कोटी रुपये हिस्सा म्हणुन पाकिस्तानला द्यावे लागतील तर दुस-या महायुद्धात आपल्या देशाने घेतलेल्या 110 कोटी कर्जाच्या रकमेचा 1/3 हिस्सा पण पाकिस्तानकडुन वसुल करावा लागेल. तुम्ही बँरिस्टर आहात, तुम्हाला कायदा चांगलाच माहित आहे.

पाकिस्तानला 55 कोटी देण्यासाठी उतावीळ होऊन आकांडतांडव करणा-या पाकिस्तानप्रेमी गांधीनी या गोष्टीला मात्र पटेलांना स्पष्ट नकार दिला. हा कसला दुटप्पीपणा...???
उत्तर:
 ५५ कोटीची वाटणी झाली तेंव्हा भारताला राष्ट्रीय कर्ज नव्हते.दुसऱ्या महायुद्धात आपण जे ब्रिटनला अन्न्धान्न्य/सैनिकी सामान दिले त्याचे पैसे ब्रिटन आपल्याला देणे लागत होते याला sterling balances असे नाव होते ,हे पैसे आपल्या ब्रीतैन १९५६/५७ पर्यंत देत होते. तेंव्हा कर्जाचा हिस्सा पाकिस्तानला देणे आणि सरदार पटेल याना गांधीजीनी सांगणे इ.,हिंदुत्ववाद्यांचा कल्पना विलास आहे.

3) गांधीँचा गोडसेँनी वध केला नसता तर 3 फेब्रुवारी 1948 ला गांधींच्या समर्थनाच्या जोरावर भारताची अजुन एक फाळणी निश्चित होती. जिनांची मागणी होती की पश्चिम पाकिस्तानातुन पुर्व पाकिस्तानात जायला खुप वेळ लागतो आणि हवाई जहाज वापरुन जायची सगळ्यांची कुवत नसल्यामुळे आम्हाला बरोबर भारताच्या मध्यातुन एक कोरिडोर बनवुन द्या. जो
A) लाहोर ते ढाका जाऊ शकेल.
B) दिल्लीच्या जवळुन जाईल.
C) ज्याची लांबी 10 मैल हवी आणि या रस्त्याच्या दोन्ही बाजुला फक्त मुस्लिम वस्त्या बनतील.
उत्तर:
३ फेब्रुवारी १९४८ ला फाळणी कशी निश्चित होती हेसुध्दा याच कल्पनाविलासाचा एक भाग आहे.महत्मा गांधी,नेहरू,सरदार पटेल,राजेंद्र प्रसाद हे सगळे अतिशय हुशार आणि चाणाक्ष नेते होते .असा corridor देणे म्हणजे भारत पाकिस्तानला देणे हे ह्या नेत्यांना पूर्ण माहित होते.एक उदाहरण देतो ,फाळणीनंतर जीनांनी माउंटबटनला पत्र लिहून पाकिस्तानच्या high commssion [embassy ] साठी दिल्लीचा लाल किल्ला मागितला होता.त्या पत्रावर माउंटबटनने "Jawahrlal,your comments please....." असे लिहून नेहरुना पाठविले ,नेहरूंनी त्या पत्रावर "?????????" अशी टिपणी लिहिली आणि भेटीत माउंटबटनला सांगितले की चंद्रगुप्त मौर्यापासून ते मुघल साम्र्यज्याच्या इतिहासाचा भारत वारसदार आहे आणि पाकिस्तान हे फक्त फुटून निघालेले प्रांत आहेत जे एक दिवस परत येतील.
आम्ही पाकिस्तानला लाल क़िला देणे म्हणजे तो वारसा देणे आहे.म्हणून प.नेहरूंनी दर वर्षी १५ ऑगस्टला पंतप्रधानांनी लाल क़िल्ल्यवरुन राष्ट्राला उद्देशून भाषण देण्याची प्रथा सुरु केली.
आता असे लोक पाकिस्तानला भारतातून corridor देतील असे वाटणे हे मूर्खपणाचे आहे......
भारताची फाळणी अटळ आहे हे कांग्रेस,हिंदूमहासभा आणि इतर सर्व पक्षाना साधारण १९४० पासून स्पष्ट दिसू लागले होते.कारण ब्रीतीशानी जाणून बुजून फुलविलेला हिंदू-मुस्लीम द्वेष हा अतिशय पराकोटीला पोचला होता. जो पर्यंत ब्रिटीश सत्तेत होते तो पर्यंत मुस्लीम लीगला पूर्ण मोकळीक होती म्हणून कांग्रेसचा प्रयत्न होता की कसे ही करून ब्रिटीश जावे आणि सत्ता ताब्यात यावीत्यासाठी १९४०चा राजाजी फॉर्मुला,१९४४ चा भुलाभाई देसाई-लियाकत अली करार१९४४ची गांधी जिन्ना बोलणी, Cripps Mission हे सगळे त्याच धडपडीचा भाग होता.
१९४६ साली ब्रीतीशानी Cabinet mission पाठविले आणि त्यांनी सांगितलेला मसुदा होता
] भारत एक राहिल
] पण पूर्व आणि पश्चिमच्या दोन्ही बाजूला पूर्ण पंजाब [म्हणजे सध्याच्या भारतातील पंजाब,हरियाणा,हिमाचल प्रदेश ही राज्ये ]आणि पूर्ण बंगाल आणि आसाम [यात भारतीय बंगाल आणि उत्तर पूर्वेकडील ७ राज्ये आली असती ] यांचे दोन मुस्लीम बहुसंख्येचे समूह असतील,
] सगळी संस्थाने स्वतंत्र राहतील
] केंद्राकडे फक्त सरक्षण,चलन आणि दळणवळण राहील
] बाकी सर्व अधिकार ज्यामध्ये कर बसविणे,कायदे करणे इ. येईल हे राज्याकडे राहतील
] कुठल्याही प्रांताला भारतापासून कधीही फुटून निघता येईल .
ही योजना मान्य करणे म्हणजे देशाची आत्महत्या झाली असतीपण देश एक ठेवण्यासाठी तत्कालीन कांग्रेस अध्यक्ष मौलाना आझादांनी या योजनेला कांग्रेसतर्फे मान्यता दिलीजिनांना तेच हवे होते त्यामुळे त्यांनी आणि मुस्लीम लीगने या योजनेला ताबडतोब मान्यता दिली.
त्या बरोबर या योजनेतला धोका गांधी-नेहरू-पटेल या त्रयीने ओळखलागांधीनी सरदार पटेलांच्या साहाय्याने [कांग्रेस संघटना सरदार पटेलांच्या ताब्यात होती] आधी मौलाना अझादाना काढून नेहरुना कांग्रेस अध्यक्ष म्हणून आणले आणि नेहरूंनी पहिल्याच पत्रकार परिषदेत खुसपट काढून कॅबिनेट मिशन प्लान उधळून लावला.
त्यानंतर देशातली परिस्थिती झपाट्याने बिघडत गेली आणि ब्रिटीश दंगे आवरायच्या ऐवजी ते भडकावत गेले . 
ब्रीतीशानी जून १९४८ पर्यंत भारत सोडण्याचा निर्णय जाहीर केला होताआणि ब्रीतीशाना भारत हा आगीच्या लोळात आणि ६५० संस्थाने आणि सर्व जाती-जमाती एकमेकाशी यादवी युध्दात सोडून जाणे होते. त्यासाठी त्यांनी हळूहळू ब्रिटीश फौजा मागे घेऊन कलकत्तामुंबईमद्रास आणि कराची मार्गे भारत तसाच ज्वालांमध्ये सोडून जाण्याचा प्लान बनविला होतेजिना आणि मुस्लीम लीग ब्रिटीश पाठींबा असल्याने काहीही ऐकायला तयार नव्हते. आणि यादवी युध्द भडकू लागले होतेजर भारतीय सैन्य आणि पोलीस . या यादवी युध्दात सामील झाले असते तर परिथिती हाताबाहेर गेली असती. मुस्लीम लीगच्या मंत्र्यांनी केंदिय मंत्रिमंडळाचे काम अशक्य केलेहोतेअशा वेळेस फाळणी शिवाय पर्याय नाही ह्या निष्कर्षाला पहिले सरदार पटेल आणि प.नेहरू आलेकारण फुटून गेलेले प्रांत जर सत्ता हातात असली तर परत आणता येतातसंस्थाने खालसा करता येतात ,प्रबळ केंद्र आणि आर्थिक विकास या गोष्टी जर शांततेने ब्रीतीशांकडून फार अपाय न झालेला देश मिळाला तर होऊ शकतोया दोघांनी मग गांधीराजेन्द्रप्रसादराजाजीमौलाना आझाद आणि इतर कांग्रेस नेत्याना convince केले.

4) गोडसेँनी गांधीजीँचा वध केला कारण गांधीँच्या मुस्लिमप्रेमापोटी हिँदुंवरील अत्याचार प्रचंड वाढले होते. उर्दुला भारताची राष्ट्रभाषा बनवण्याच कारस्थान रचल जात होत. धर्मावर आधारित जगातील भयानक अशी फाळणी झाली होती. सतलज नदीचं पाणी पाकिस्तानला द्यायच आणि कोणतेही संवैधानिक अधिकार नसताना पाकिस्तानला 55 कोटी द्यायचा दुराग्रह गांधीनी केला होता.
उत्तर:
गोडसेने गांधींचा खून करण्यामागे ५५ कोटी तर नक्कीच नव्हते. सतलज नदीचे पाणी पाकिस्तानला देण्याचा जावई शोध कुणाच्या डोक्यातून आला हा एक प्रश्नच आहे. काश्मीर हा मुस्लीम बहुमताचा प्रांत असल्याने तो पाकिस्तानला जायला हवा होता पण भारतातल्या बहुतेक सर्व नद्यांचा उगम काशिमीर/लाधाख मध्ये असल्याने ज्याच्या हातात काश्मीर तो देश दुसऱ्या देशाला पाण्यावाचून मारू शकतो म्हणून साम,दाम ,दंड भेद वापरून गांधी-नेहरू -पटेलांनी काश्मीर आपल्या ताब्यात आणला आणि गेले ६५ वर्षे लाखो फौजा वापरूनअब्जावधी रुपये खर्चून आणि स्थानिक लोकांचे बंड झेलून आपण काश्मीरवर कबजा ठेवला आहे ,पाकिस्तान सुध्दा पाण्यासाठीच काश्मीरच्या मागे लागला आहेहे आहे पाण्याचे महत्व.
फाळणीच्या वेळी फिरोझपूर जिल्ला मुस्लीम बहुल असल्याने पाकिस्तानात जाणार होताआता त्यावेळच्या राजस्तानातील कालव्यांचे Headworks फिरोझपुरला होतेत्यामुळे जैसलमेरबिकानेर इ. संस्थानिक सरदार पटेलाना भेटले की जर फिरोझपूर पाकिस्तानात गेले तर आम्हालाही पाकिस्तानात जाण्याशिवाय गत्यंतर नाहीपटेलांनी त्याना पनेहरुकडे पाठविले.नेहरूंनी आपले माउंटबटनकडे असलेले आपले वजन वापरून रडक्लिफ कमिशनचा निर्णय फिरवून फिरोझपूर भारतात सामील करविले.
फाळणीच्या वेळेस काश्मीरचे सगळे दळणवळण हे रावलपिंडीमार्गे होते अथवा गुरुदासपूर जिल्ह्यातील पठाणकोट मार्गे होतेगुरुदासपूर मुस्लीम बहुसंख्येचा असल्याने तो पाकिस्तानात जाणार होता.कारण फाळणीचा जिल्हा हा घाताक्निहाय होता,पुन्हा प.नेहरूंनी आपले वजन वापरून गुरुदापूर जिल्ह्याची फाळणी करवून ४ तालुके भारतात आणि ३ पाकिस्तांत गेले.यामुळे पठाणकोट तालुका भारतात आला आणि काश्मीरचे दळणवळण भारताशी राहिले जे पुढे ३ महिन्यांनी अनन्यसाधारण महत्वाचे ठरले.
पाण्याचे आणि काश्मीरचे महत्वाचे एक उदाहरण म्हणजे १९६५च्या युध्दात आपण धरणातून पाणी सोडून पूर आणून त्यात १०० च्या वर पाकिस्तानी रणगाडे खेमकरण येथे पाण्यात बुडवून पाकिस्तानी सैन्याचा कणा मोडला .
उर्दूला भरतची राष्ट्रभाषा जिथे मौलाना अबुल कलम आझाद स्वातंत्र्यानंतर १० वर्षे शिक्षण मंत्री असून करू शकले नाही तिथे १९४७ मध्ये कसे शक्य होते.हिंदुत्ववाद्यांचा गान्धीविरोधी प्रचार हा अशा बाजार्गाप्पावर असतो.

5) 22 आँक्टोबर 1947 ला पाकिस्तानने काश्मीरवर आक्रमण केल्याने पाकिस्तानला 55 कोटी रुपये देणे केँद्रीय मंत्रीमंडळ टाळत होते. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जर गांधीनी 55 कोटी देण्यासाठी आमरण उपोषणा केल नाही तर सरकारने पाकिस्तानला पैसे का दिले...? नेमक कारण सांगा.

6) जुन 1947 मध्ये दिल्लीत आयोजित केलेल्या अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या बैठकीत भारत विभाजनाचा प्रस्ताव अस्विकार केला जाणार होता पण गांधीजीनीच त्या प्रस्तावाचे समर्थन केले. देशाचे विभाजन माझ्या म्रुत्युशय्येवरच होईल असे सांगणा-या गांधीँचा हा दुतोँडीपणा कशासाठी...???
उत्तर:
 ] आणि ६ चे उत्तर आधीच्या उत्तरात आले आहे....

7) फाळणीवेळी जिनांनी हिँदु मुस्लीम लोकसंख्येच्या संपुर्ण अदलाबदलीचा प्रस्ताव ठेवला होता पण गांधीनी तो का स्वीकार केला नाही...?
उत्तर:
‎जीनांनी लोकसंख्येच्या अद्लाबद्लीचा प्रस्ताव जसा प्रचार केला जातो तसा दिला नाही.१९४६ मध्ये वव्हेल सिमला वाटाघाटी आणि कॅबिनेट मिशन प्लान यामध्ये कांग्रेसचा एकच मुद्दा होता की पूर्ण भारतभर हिंदू-मुस्लीम लोकसंख्या ही अशा प्रमाणात एकमेकात मिसळली आहे आणि बंगाल अथवा कोकणातला मुसलमान हा पंजाबी मुस्लिमापेक्षा तिथल्या स्थानिक हिंदुशी जवळचा आहे.त्यामुळे हिंदू मुस्लीम हे दोन देश नाहीत आणि जीन्नांचे पाकिस्तान हे व्यवहार्य नाही.या मुद्द्याला उत्तर म्हणून जीनांनी सांगितले की जर मिश्र लोकसंख्या ही एकच अडचण असेल तर हिंदू मुस्लीम लोकसंख्या अदलाबदल करावी. पुढे जेंव्हा कांग्रेसने फाळणी मान्य केली तेंव्हा जिन्ना अथवा मुस्लीम लीगने ही गोष्ट पूर्णपणाने सोडली [dropped the offer].

8) दिल्लीमध्ये हिँदु निर्वासितांना राहायला कोणतीच व्यवस्था नसल्याने खाली पडलेल्या मशीदीँमध्ये हिँदुनी शरण घेतली तेव्हा गांधीनीच दिल्ली पोलिसांना आदेश दिला की, मशीदीवर हिँदुंचा कोणताही अधिकार नाही. त्यांना हाकलुन लावा आणि मशीदी खाली करा. कड...कडीत थंडीत महिला आणि छोटीछोटी मुल गटाराच्या किनारी राहु लागली. जेव्हा हे निर्वासित गांधीजीँना भेटुन शरण मागायला गेले तेव्हा बिर्ला भवनमध्येच गांधीनी त्यांना सांगितले की तुम्ही का आलात इथे...? पाकिस्तानात अहिँसात्मक प्रतिकार करायचा होता...?? तुम्ही इकडे परत आलात हाच तूमचा अपराध आहे. ज्या पाकिस्तानातुन रेल्वे भरुन "आजादी का तोहफा" लिहुन हिँदुंची प्रेते पाठवली जात होती त्याच पाकिस्तानात महिला आणि लहान मुलांना अहिँसात्मक प्रतिकार करायचा मुर्खपणाचा सल्ला गांधीजी कसे काय देऊ शकतात...???
उत्तर:
मला तरी गांधी निर्वासित बायकाना असे काही म्हनालाचा उल्लेख मिळाला नाही.आपण संदर्भासहित [बाजारगप्पा नाही] दिलात तर मी तपासून सांगू शकेन.

9) गांधीनी जिनांना "कायदे आजम" ही उपाधी कशी काय दिली...?
उत्तर:
जिनांना क़ैद-ए -आझम [great leader]ही पदवी देण्यासही गांधीजींचा काहीही संबंध नव्हतां.जिनांना ही पदवी १९१६च्या मुस्लीम लीग अधिवेशनात मौलाना मोहानि यांनी दिली. त्या वेळेस गांधीजीचा भारतीय राजकारणात उदयसुध्दा झाला नव्हता.

10) भगतसिँग, सुखदेव आणि राजगुरुला सोडवण्यासाठी काँग्रेसवर आतुन दबाव होता. समस्त भारतीय जनतेची ती मागणी होती. भगतसिँगची वाढती लोकप्रियता पाहुन प्रसिद्धिला हपापलेल्या गांधीनी ते होऊ दिले नाही. काही दिवसातच गांधी-आयर्विन करार झाला ज्यात ब्रिटीश सरकार राजकीय कैद्यांना सोडवण्यास तयार झाली. जर गांधीनी थोडा दबाव आणला असता तर भगतसिँग वाचले असते.
१८५७ पासून ब्रिटीशांनी एक अत्यंत कठोर निती ठेवली होती की जी व्यक्ती अथवा संघटना सरकारविरुध्द शस्त्र उचलेल त्यांची पाळेमुळे खणून काढावयाची.खूनात प्रत्यक्ष भाग घेणार्‍यांना फाशी,आजुबाजुच्या लोकांना ,नियोजन करणार्‍यांना २५/५० वर्षे काळे पाणी आणि सरसकट सगळ्याची मालमत्ता जप्त करणे ,नोकर्‍यावरुन काढणे इ. ज्यांच्यावर संशय आहे पण पुरावा नाही त्यांच्यावर दूसर्‍याच फालतू कारणाने खटला भरुन लांब कैद जसे लोकमान्य टिळकांवर अग्रलेखावरुन खटला भरुन ६ वर्षे मंडालेला पाठविले जिथे त्या थोर महामानवाची प्रकृती कायमची ढासळली.या नियमाला काहीही अपवाद नव्हतातेंव्हा भगतसिंग राजगुरू सुखदेव यांची सुटका गांधींच्या सांगण्यावरून करेल ही कल्पनाच चुकीची आहे.
१९३० च्या आंदोलनात कान्ग्रेसने सोलापूर शहर ८ मे १९३० ते १२ मे १९३० या काळात ताब्यात घेतले होते आणि सशस्त्र आंदोलन करून ब्रिटीश शहर सोडून पळून गेले होते. ५ दिवसानंतर ब्रिटीश फार मोठी फौज घेऊन परत आले, अवाढव्य दडपशाही केली.मल्लाप्पा धनशेट्टी , अब्दुल रसूल क़ुर्बान हुसेन , जगन्नाथ भगवान शिंदे आणि श्रीकिसन ळक्ष्मीनारायण सारडा या कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर हिंसाचाराचा खटला भरून त्याना फाशी शिक्षा दिली.या वीराना १२ जानेवारी १९३१ रोजी फासावर लटकाविले . भगतसिंग इ.ना २३ मार्च १९३१ ला .आता एक क्षणभर असे मानले की गांधीजी अतिशय दुष्ट होते आणि त्यांनी मुद्दाम भगतसिंग इ.ना वाचविले नाही.
पण जिथे गांधीजी आपल्या कांग्रेस कार्यकर्त्याना वाचवू शकले नाही तिथे ते भगतसिंग इ. ना कसे वाचवू शकले असते?
१९२२ मध्ये सत्याग्रह करणाऱ्या जमावाने उत्तरप्रदेशातील चौरीचोरा इथे दंगल भडकून २२ पोलिसाना जिवंत जाळले .महात्माजींनी त्यामुळे सत्याग्रहाचे आंदोलन मागे घेतले.त्यानंतर ब्रीतीशानी अमानुषपणे १९ लोकाना फाशी, ११० लोकाना जन्मठेप आणि ४३ लोकाना ५ ते १२ वर्षे जेलची सजा दिली .ब्रिटीश भागात्सिंगाना सोडणार नव्हते ही गोष्ट आपण समजून घेत नाही,गांधी अथवा नो गांधी.
गांधीजीनी तत्कालीन व्होईसरॉयला लिहिलेले पत्र या लिंकवर उपलब्ध आहे ,जरूर वाचणे.....
http://www.mkgandhi.org/faq/q26.htm
जालियानवाला हत्याकांड(April 13, 1919) हे महात्माजींच्या आयुष्यातला एक महत्वाचे वळण होते.तो पर्यंत त्यांचा विश्वास होता की ब्रीतीशाक्डून वसाहतीचे स्वराज्य घ्यावे.[dominion status जसे ऑस्ट्रेलिया,नुझीलंडचे आहे.]पण या हत्याकांडामुळे गांधीजी ब्रिटीश हे दुष्ट आहेत आणि संपूर्ण स्वराज्य हे मिळवले पाहिजे या निष्कर्षाला पोचले.
कांग्रेस सत्य्ग्रहातून पंजाबमध्ये ८ एप्रिल १९१९पासुन दंग्यांना सुरुवात झाली आणि लोकांनी सरकारी इमारती,पोलीस इ.वर हल्ले सुरु केले. त्यात एका ब्रिटीश बाईवर बाझारात हल्ला करण्यात आला आणि ब्रिटीश धोरणाप्रमाणे भारतीयाना धडा शिकविण्यासाठी जन डायरने शेकडो लोकांचे हत्याकांड केले.
ही बातमी कळल्यावर गांधीनी पंजाबला जाण्याचा प्रयत्न केला.पण सरकारने त्याना ८ एप्रिल ला पंजाबमध्ये येण्यास जी मानाई केली होती त्याप्रमाणे त्याना येऊ दिले नाही.३ वेळा त्याना पंजाबच्या सरहद्दीपासून परत पाठविले. तरीही नेहरू,सरदार पटेल ,.मालवीय इ. नेते तिथे गेले. सरकारी सूत्राप्रमाणे जालियानवाला जमाव हा हिंसक बनला होता म्हणून डायरने गोळीबार केला इ. आणि फक्त ३७९ माणसे मेली.
मग ऑक्टोबर १९१९ मध्ये सरकारने गांधीजीना पंजाबला जाण्याची परवानगी दिली.लाहोर आणि अमृतसर मध्ये सर्व शहर गांधीजींसाठी रेल्वे स्टेशनला लोटले.मग ब्रिटीश सरकारने जो अभियोग नावाचा विनोद चालविला होता त्याच्याविरुद्ध कांग्रेसने गांधीजीच्या अध्यक्षतेखाली अभियोग नेमला.गांधीनी सक्षिपुराव्याने सिद्ध केले की जमाव निशस्त्र होता,शांततापूर्ण होता आणि डायरने गोलीबारार १५०० माणसे मारली.ही यादी गांधीजीनी नावपत्त्यासगट प्रसिध्द केली.
गांधीजीनी स्मारकासाठी प.मालवीय यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली.जा समितीने पैसे गोळा करून जालियानवाला बाघ त्याच्या मालकाकडून १९२० मध्ये विकत घेतली.पण तिथे स्मारक बनवायला स्वातंत्र्य यावे लागले.
सरकारच्या अभियोगाने डायर हा थोड्या[???] उताविल्पनाने वागला पण निर्दोष होता असा निष्कर्ष काढला.

11) जालियनवाला बाग हत्याकांडातील खलनायक जनरल डायर वर अभियोग चालवला जावा अशी देशवासियांची मागणी होती. त्याला गांधीजीनी का समर्थन केले नाही...?
उत्तर:
भगतसिंगानी तर आगगाडी लूटण्यापासून खूनापर्यंत सगळे केले.तसेच भगतसिंग आणि त्यांचे साठी हे कडवे कम्युनिस्ट होते. त्यांनी त्यांच्या कम्युनिस्ट विचारसरणीला अनुसरुन "Indian Republican Army" ही सशस्त्र सेना स्थापन केली होती. ब्रिटिशांना जर जास्त भय कशाचे होते तर भगतसिंगासारखे कम्युनिस्ट लोक रशियाचा पाठींबा घेउन कम्युनिस्ट क्रांती घडवतील.त्या काळात कम्युनिस्ट विरोध हा वसाहतवाद्यांमध्ये अचाट होता .....
महात्मा गांधींच्या सांगण्यावरुन ब्रिटीश त्या तिघांना माफ करतील ही सुतराम शक्यता नव्हती.

12) गांधीनी एकीकडे काश्मीरचा हिँदु राजा हरिसिँगला शासन सोडुन प्रायश्चित घेण्याचा सल्ला दिला तर दुसरीतडे हैदराबादच्या निजामाला समर्थन केले.
उत्तर:
1947 च्या जून जुलै या काळात सरदार पटेलांनी बहुतेक सर्व संस्थाने साम,दाम,दंड,भेद इ. मार्गांनी विलीन करण्यात पहिले पाउल उचलले.प्रश्न होता काश्मीरचा .कारण फाळणीच्या वेळी ठरविलेल्या दंडकाप्रमाणे मुस्लिमबहुल काश्मीर हा पाकिस्तानात जाईल ही अपेक्ष होती,पण तरीही काश्मीर भारतात आणण्याचा प्रयत्न गांधी,नेहरू,पटेल करत होते.१९३५ च्या कायद्याप्रमाणे जर राजाने विलीनीकरणनाम्यावर सही केली तर काश्मीर मुस्लिमबहुल असून भारतात येऊ शकत होता,पण त्याच न्यायाने हैदराबाद ,जुनागड हे पाकिस्तानात जाऊ शकत होते.
या पूर्ण काळात काश्मीरचा महाराजा हरिसिंग हा दोन्ही दरडीवर पाय ठेवून काश्मीर स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्न करत होता.तो आणि त्याचा पंतप्रधान काक[सिद्धार्थ काकचे आजोबा] भारतविरोधी कारवाया करून जीनांच्या दाढीला हात लावत होता.जीन्नानी तर हरीसिंगाना blank cheque दिला होता पाकिस्तानात सामील होण्यासाठी .
अशा वेळेला जर महाराजा भारतात सामील झाला नाही तर दंगे भडकतील आणि पाकिस्तान काश्मीर गिळेल हा इशारा परखड शब्दात देणे जरुरी होते.नेहरू /पटेलाना महाराजाने स्पष्ट येऊ नका म्हणून सांगितले .म्हणून महाराजाला समजावयाला स्वतः माउंटबटन १८ जुन्लां ४ दिवस काश्मीरला गेला,पण महाराजा ऐकायला तयार नव्हता.मग महत्माजी ३१ जुलै ते २ ऑगस्टला काश्मीरला गेले. जेंव्हा महाराजा ऐकेना तेंव्हा गांधीजीनी त्याला सांगितले की जर "आपल्याला आपल्या प्रजेचे भले काळात नसले अथवा करायचे नसले तर आपण सन्यास घेऊन काशीला जा आणि राज्य युव्राजाना सोपवा.[युवराज करणसिंग हे भारतप्रेमी होते.]
१९२० च्या दशकात जेंव्हा गांधीजीना विचारले की आपण ब्रीतीशाना जा सांगता आहे ,मग राज्य कोण करेल ,गांधीजीनी सांगितले कोणीही भारतीय चालेल ,अगदी हैदेराबाद्चा निझामसुध्दा पण ब्रिटीश नको.हे विधान विकृत करून वापरले जाते.

13) गांधीजी अहिँसेच तुणतुण वाजवत असायचे पण त्यांनीच सैनिकांना दुस-या महायुद्धात ब्रिटीशांसाठी बंदुका हाती घ्यायला लावल्या.
उत्तर:
१]महात्माजींनी सैन्य भरतीचा पुरस्कार हा पहिल्या मह्युध्दात केला होता ,दुसऱ्या महायुध्दात नाही .
दुसऱ्या महायुध्दात सैन्य भरतीचे आवाहन जिना आणि स्वा.सावरकर यांनी केले होते.
२] आपण अगदी बरोबर शब्द वापरला आहे की महात्माजी अहिंसेचे "तुणतुणे" वाजवीत असत. ते तुणतुणे होते ,जरुरी असेल तेंव्हा वापरायचे नसेल तेंव्हा बाजूला ठेवायचे.

महात्माजींचा स्वतःचा अहिंसेवर फारसा विश्वास नव्ह्ता.१९२१ च्या सत्याग्रहात महात्माजींनी ज्या मागण्या ब्रिटीशांसमोर ठेवल्या त्यात पहीलीच मागणी आहे "भारतियांना शस्त्र बाळगण्याची मनाई रद्द करा". १९४२चा लढा,काश्मीर,जुनागड इ.ठिकाणी कांग्रेसने शस्त्र वापरले पण महात्माजींनी त्याचा कधीही निषेधसुध्दा केला नाही.
महात्माजींनी अतिशय धूर्तपणाने अहिंसा हे शस्त्र म्हणून वापरले ,तत्व म्हणून नाही. आणि महात्म्याचे समर्थक आणि विरोधक दोघेही या शस्त्राला तत्व समजून त्याचा गवगवा,धिक्कार इ.करत बसले.पण या अहिंसेचा दिखावा त्यांनी अतिशय उत्कृष्टपणाने केला.त्याचे तत्वज्ञान दाखविले.ब्रिटिश यामुळे पूर्ण बुचकळ्यात पडले आणि त्यांना या माणसाला कसे आवरावे हा मोठाच यक्षप्रश्न झाला.
या साध्या माणसाने एक गोष्ट ओळ्खली की एकदा हा समाज जागा झाला की या समाजातल्या लोकांचेच भाउ,वडील,मुलगा इ.. लष्करात,पोलिसात, Government मध्ये असतात आणि हा समाज जागा झाला की या सगळ्या संस्था हातात येण्यास वेळ लागत नाही. आझाद हिन्द फ़ौज,नाविक बंड इ. हा त्याचाच परिपाक असतो.

14) काँग्रेसच्या त्रिपुरा अधिवेशनात नेताजी सुभाषचंद्र बोसांना अध्यक्ष करण्यात आले पण गांधीजी सितारमय्याना समर्थन देत होते. त्यांनी सुभाषबाबुंना नेहमीच विरोध आणि असहकार सुरु केला. शेवटी कंटाळुन सुभाषबाबुंनी काँग्रेस सोडली.
उत्तर:
सुभाषचंद्र बोस १९११ च्या मट्रीकच्या परीक्षेत सर्वप्रथम आले,त्यानतंर केंब्रिज विद्यापिअठातून १९२२ साली बी.ए. झाले आणि त्यावर्षीच्या I.C.S.परिक्षेत दूसरे आले. हे सांगण्याचा हेतू आहे की ते कीती हुशार होते. त्यानतंर त्यानी I.C.S. चा राजीनामा दिला आणि भारतात येउन सी.आर.दास यांच्या हाताखाली कांग्रेस चळवळीत भाग घेतला.
असा हुशार,लोकप्रिय नेता गांधिजींच्या प्रभावाखाली आला त्याला काहीतरी कारण असेलच. दास यांच्या मृत्युनंतर बोस बंधु बंगाल कांग्रेसचे सर्वेसर्वा होते. कांग्रेसने नेताजींना कायम दुर्लक्षीत ठेवले ही माहीती सपशेल चुकीची आहे. कांग्रेसची संघटना आणि खजीना हा स्वातंत्र्यपूर्व काळात सरदार पटेल गटाच्या ताब्यात होता. कांग्रेसमध्ये जो समाजवादी गट होता त्याचे नेते प.नेहरु आणि नेताजी होते. आणि या गटाचे दूसर्‍या पातळीचे नेते जयप्रकाश नारायण, डा.लोहिया, एस.एम.जोशी हे होते. या समाजवाद्यांचे नेहरु आणि नेताजी फार लाडके होते. स्वातंत्र्यानतंर कांग्रेसने जी आर्थीक धोरणे अवलंबिली जसे धरणॆ ,पाट-बंधारे,जड उद्योग [heavy industries] ,मिश्र अर्थव्यवस्था याचा पूर्ण आराखडा कांग्रेसकडे तयार होता. कांग्रेसकडे "Congress Planning Commision" या नावाची संस्था होती[ज्याची वारसदार सध्याचे Planning Commision आहे] त्याचे मूख्य होते नेताजी आणि पहिल्या दोन पंचवार्षीक योजनाचा संपूर्ण आराखडा हा नेहरु आणि नेताजींनी स्वातंत्र्याच्या १७ वर्षे आधी १९३१च्या कांग्रेस अधिवेशनात सादर केला होता. नेहरु आणि नेताजींची मैत्री ही त्यावेळच्या सगळ्या जगाला माहीत होती.

श्री. इदिंरा गांधीना क्षय रोग कमला नेहरुंची सेवा करुन झाला. त्या काळी क्षय रोग हा असाध्य होता .त्यासाठी श्रीमती इंदिरा गांधीना १९३६ मध्ये स्वीझर्लंड्मधल्या इस्पीतळात जव्ळ जवळ दीड वर्षे ठेवले होते तेंव्हा त्याना नियमीत भेटायला फ़क्त नेताजी आणि फिरोझ गांधी जात होते.
१९३३ ते १९३६ चांगल्या वर्तणुकीच्या हमीवर नेताजी युरोपात होते,त्या काळात त्यांनी मुसोलिनी व काही जर्मन नाझींची मैत्री केली,त्यांच्या सारख्या समाजवादी माणसाला नाझींची मैत्री हा फ़ार मोठी तत्वाला घातलेली मुरड होती.
नेताजी १९३८ ला कांग्रेसचे अध्यक्ष झाले ते गांधीजीच्या आशीर्वादाने.
तसेच १९३९ एप्रिल पर्यंत महायुद्ध भडकणार हे स्पष्ट होते ,त्यामुळे जर शत्रुराष्ट्राची मदत घेणे असेल तर त्यासाठी सुभाश्बाबुना कांग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी निवडणे भाग होते.मग भांडणाचे नाटक तेही वृतपत्रातून,सरदार पटेलांनी नेताजींवर केस टाकणे की यांनी माझ्या भावाला फसवून मरणोत्तर त्याची इस्टेट ढापली इ. नाटके झाली.
नेताजींनी कधीही कांग्रेस सोडली नाही ,त्यांनी कांग्रेसअंतर्गत Forward Block ही संस्था स्टेपन केली.

1] आझाद हिंद फ़ौजेत फ़क्त दोनच सुट्ट्या असावयाच्या २६ जानेवारी जानेवारी जो कांग्रेसने १९३० साली स्वातंत्र्यदिन म्हणून घोषित केला होता आणि २ आक्टोंबर ,महात्माजींचा वाढदिवस.
2] महात्मा गांधीना "राष्ट्र्पिता" ही पदवी प्रथम सुभाषबाबूंनी रेडिओ बर्लिनवरुन भाषण करतांना दिली होती.
3]आझाद हिंद फ़ौजेचे राष्ट्रगीत " जन मन गण " होते ज्याची जर्मनीत पाडलेली रेकार्ड आजही उपलब्ध आहे.
] आझाद हिंद फौजेचा ध्वज हा तिरंगा होता.
] सुभाष बाबुनी सांगितले की माझे सरकार हे हंगामी सरकार असेल आणि स्व्तान्त्र्यानंतर कांग्रेस सरकार स्थापन करेल.
6]जपानी हल्यापुढे ब्रिटीशानी माघार घेतली तर कांग्रेस संघटनेने देश कसा ताब्यात घ्यावा ह्याच्या सीक्रेट आदेश मी ,मौलाना आझाद आणि सरदार पटेलानी दिलेले आहेत
]महात्मा गांधी ४२ चा लढा सशस्त्र असेल आणि भूमिगत व्हा हे सांगत देशभर समाजवादी नेत्यांच्या बैठका घेत हिंडत होते ही गोष्ट एस.एम.जोशींनी त्यांचे आत्मचरीत्र "मी एस.एम." यात नोंदवली आहे.
कांग्रेसचे सगळेच नेते धूम्र पडदा[Smoke screen] तयार करण्यात फार हुशार होते.
] युध्दानंतर २० वर्षानी प. नेहरु बरिस्टरीचा रोब परिधान परीधान करुन आझाद हिंद फ़ौजेच्या बचावाला लाल किल्ल्यातल्या खटल्यात उभे राहीले, युध्दानंतर बेचिराख झालेल्या युरोपात नेताजींच्या ऑस्ट्रियन बायको आणि मुलीचा शोध घेऊन नेताजींच्या बायकामुलांची काळजी एक शब्दही न बोलता कांग्रेस पक्षाने घेतली...प्रतिप्रश्न: अजित सर तुम्ही ज्या काही गोष्टी मांडल्या त्या मला तरी पटल्या आहेत. मला उगाच कुसपट काढायची सवय नाही. तरीही तुम्ही सुभाषचंद्र बोसांच्या विषयी जे काही स्पष्टीकरण दिल ते मला पटल नाही. सुरुवातीस एकत्र असले तरी सुभाषचंद्र आणि गांधीजीँच्या मध्ये नंतर अनेक मतभेद निर्माण झाले होते. पण तुम्ही सगळ काही आलबेल होत असच दाखवताय. सुभाषबाबुंना पुन्हा काँग्रेसचा अध्यक्ष करण्यास गांधीजीँचा विरोध होता. तरीही सुभाषबाबुंनी ती निवडणुक आपल्या सामर्थ्यावर जिँकुनही दाखवली. तरी देखील गांधीजी आणि त्यांच्या सहका-यांनी नेताजीँशी असहकार चालुच ठेवला. त्याला कंटाळुनच नेताजी काँग्रेस सोडुन गेले. नेताजी सापडले तर त्यांना देशद्रोही म्हणुन अटक केले जावे असा करार देखील गांधीनीच इंग्रजांशी केला. तुम्ही त्यावर काहीच भाष्य केले नाही.
उत्तर
१]नेताजींनी कांग्रेस कधीही सोडली नाही. कांग्रेसच्या अंतर्गत जे अनेक गट होते त्याप्रमाणे नेताजींनी कांग्रेस अंतर्गत Forward Block ही ही संस्था स्थापन केली.
२] एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की कांग्रेसच्या वरिष्ठ नेत्यापैकी नेताजी चांगल्या वर्तणुकीची हमी देऊन १९३३ला युरोपला रवाना झाले.या काळात सरदार पटेलांचे वडील बंधू विठलभाई पटेल हे ही गांधीजीशी भांडून[???] युरोपात होते. या दोघांनी पूर्ण युरोप पालथा घातला ,त्यात आयर्लंडचे डे वालेरा होते .यांनी युरोपात सशस्त्र क्रांतीची चाचपणी केली.विठलभाई पटेलाचा जिनेव्हा ,स्वित्झर्लंड इथे २२ ऑक्टोबर १९३३ ला मृत्यू झाला.त्यात त्यांनी आपल्या मालमत्तेचे ट्रस्टी म्हणून नेताजींना नेमले आणि हा पैसा देशकार्यासाठी वापरावा हे सांगितले.
३] या तीन वर्षात सुभाषबाबुनी मुसोलीनिशी मैत्री जोडली आणि नाझी लोकांशी ,रशियाशी मैत्री जोडली.नेताजी स्वतः डाव्या विचारांचे असल्याने त्याना नाझींशी मैत्री हा प्रकार फार दुसह होता. नाझीना भारतीयांबद्दल फार घृणा असल्याने आणखी त्रास झाला.
४] गांधीजी आणि कांग्रेस जे स्वातंत्र्याचे विविध मार्ग धुंडाळत होते त्यापैकी हा एक मार्ग होता.आणि हे मार्ग गांधीजींच्या संमतीशिवाय धुंडाळले जात नव्हते.याच कालखंडात प .नेहरू चीन आणि रशियाला जाऊन आले .[१९२५ ते १९३५ ]
५] १५ मार्च १९३९ ला जेंव्हा हिटलरच्या फौजा उर्वरित झेकोस्लोवाकियात घुसल्या तेंव्हा वर्षात 
युरोपात युध्द पेटणार हे निश्चित झाले. तेंव्हा जर्मनी आणि रशियाची मदत घेऊन युध्द करणे हा मार्ग कांग्रेसला भाग होते.
६] पण या मार्गामध्ये ब्रिटीश सरकारला संशय येऊ न देणे हे महत्वाचे होते. ३ वर्षाच्या युरोप वास्तव्यामुळे आणि वयाने सुभाषबाबू यासाठी अतिशय योग्य होते.
मग लहान मुलासारखे सर्व कांग्रेस नेते एकमेकाशी भांडले , सर्व भांडणे वृत्त पत्रातून खेळली गेली, त्रिपुरी अधिवेशनात महात्माजींनी नाही सांगूनही सुभाषबाबू उभे राहिले,निवडून आले,आणि स्ट्रेचरवर स्टेजवर आले.मग कांग्रेस महासमितीच्या इतर सर्व सदस्यांनी राजीनामे दिले.

वल्लभभाई पटेलांनी सुभाषबाबुनी माझ्या भावाला [विठलभाईना ] मृत्युशय्येवर फसवून त्याची इस्टेट सुभाशबाबुनी ढापली म्हणून त्यांच्यावर कोर्टात दावा ठोकला.
हे सगळे नाटक वर्तमानपत्रातून इतक्या बेमालूमपणे खेळले गेले की सगळ्याना खरे वाटावे.
या नंतर सुभाषबाबू,नेहरू आणि गांधीजी यांची कलकत्त्यात ३ दिवस बैठक झाली आणि काही महिन्यात सुभाषबाबू पळाले.
कलकत्ता ते काबुल या प्रवासात त्यांची काळजी मुख्यतः कांग्रेसच्या लोकांनी घेतली .
म्हणून सुभाश्बाबुंची आझाद हिंद रेडियोवरील भाषणे आणि त्यातल्या त्यात महात्मा गांधीना राष्ट्रपिता ही पदवी देणारे १८ जुने १९४४ चे भाषण वाचण्यासारखे आहे.

18 comments:

 1. अनुपम कांबळी ह्यांचे प्रश्न माझ्यामते अतिशय चांगल्या प्रकारे मांडल्या गेले आहेत. पण मला असे वाटते कि त्यांची उत्तरे पण अतिशय समर्पक आहेत.अनुपम कांबळी ह्यांनी प्रश्न्न अतिशय उत्कठ्तेने विचारलेले आहेत .एक जिज्ञासू म्हणून मी मला ते पटले सुद्धा. .....................
  पण माझ्या मते हे प्रश्न एकतर्फी भावनेतून विचारले गेले आहेत.आणि त्यांचे शंका समाधान करण्यात मी थोडा हातभार लावू इच्छित आहे. मी कोणी गांधी समर्थक नाही आणि विरोधकहि नाही.पण आजकाल आपल्याकडे एक हौस निर्माण झाली आहे कि इतिहासात हात घालावी मी हि तेच करत आहे. महात्मे ( गांधीजींबरोबर टिळक,सावरकर,पटेल,नेताजी ई. ) हे ह्यासाठीच महात्मे आहेत कि त्यांनी एक मोठ्या कार्यात आपले योगदान दिले आहे. निर्णय हे चांगल्यासाठीच घेतले जातात. नेहराला ओवर का दिली म्हणून धोनी गांगुली वर पण प्रश्न उठतात. ह्याचा अर्थ असा नाही कि नेहरा चांगला गोलंदाज नाही किंवा धोनी ,गांगुली हे मूर्ख किवा धूर्त आहेत.
  १) ५५ कोटी देणे हेच त्याकाळी न्याय्य होते.शिवाय एक सर्वसमावेशक देश म्हणून भारताची प्रतिमा बनवायची होती (काश्मीर जबरदस्तीच्या राजकरणतून घेतल्यावरून UN मध्ये बोंबाबोंब होत होती). जगाच्या राजकारणात एक निर्णायक देश होण्यासाठी अश्या गोष्टी आवश्यक असतात. आणि अजित पिंपळखरे ह्यांनी दिलेले sterling balances चे स्पष्टीकरण उत्तर चांगल्या प्रकारे स्पष्ट करते.
  २) equal balance नुसार हैदराबाद आपण घेतले तर काश्मीर पाकिस्तानचे असा समर्पक युक्तिवाद होता आणि त्यात इंग्रज आघाडीवर होते. पण भौगोलिक महात्वामुळेच काश्मीर भारतात सामील करणायत आले. त्यात एक मोठे राजकारण (देशहीतार्थ) करण्यात आले.
  ३) गांधीजी निर्वासित स्त्रियांना "का आलात ?" असे विचारतील हे प्रश्न करणार्यांना पण कसे वाटले ह्या बद्दल मला नवल वाटते.
  ....मझे आणि अनुपम ह्यांचे मत सुभाषबाबूंच्या बाबतीत एक आहे .इतिहासाच्या पुराव्यानुसार गांधीजी नेहरू आणि पटेल ह्यांच्या कडे biased असावेत असे स्पष्ट होते. पण कदाचित त्या काळाची हीच गरज असावी कारण आंतरराष्टीय राजकारणात मुसोलिनी आणि हिटलर सोबत संधी केलेले सुभाषचंद्र बोस ह्यांपेक्षा नेहरू सरस ठरले असते आणि ठरले सुद्धा. नेहरूंनी नंतर बरेच चुकीचे निर्णय घेतले उदा. चीन ला UNSC मधली membership देणे (स्वतः न घेता ) आणि विनाकारण काश्मीर प्रश्न उन मध्ये नेणे ई.
  ...................पण पूर्णपणे मला वाटते कि एक राष्ट्रपित्यावर आपण एवढे ताशेरे उडवतो हि आपल्या देशाची शोकांतिका आहे.आणि गोडसेंना मरायचेच होते तर जिनांना मारायचे. भाऊबंदसोबतच्या जमिनीच्या वाटणी मध्ये बाप जर मवाळ वागत असेल आणि त्यामुळे आपल्याला त्रास होत असेल म्हणजे बापाला मारायचे कि काय?..................कोण चांगला होता आणि कोण वाईट ? हे कधीही कोणी ठरवू शकत नाही कारण आपण इतिहास वाचू शकतो पण इतिहास घडवनार्यांचे (किंवा तो इतिहास आपल्या मतानुसार customize करणाऱ्या इतिहासकारांचे ) मन वाचू शकत नाही. आणि ह्या चुका झाल्याही असतील तर हा इतिहास हेच शिकवतो कि ह्या चुका पुन्हा होता कामा नये.
  -Abhishek Muley

  ReplyDelete
  Replies
  1. अभिषेक...मुळात आपली शोकांतिका ही आहे की काही जाणून नं घेताच...आपण वाहवत जातो. त्या काळात काय घडलं, का घडलं, ह्याचा अभ्यास नं करता उठसुठ गांधींना फाळणीसाठी जबाबदार धरणं, भगतसिंगांच्या फाशीसाठी दोषी मानणं फारच चुकीचं वाटतं!

   चुका झाल्याही असतील गांधींकडून, नेहृंकडून...पण तू अगदी बरोबर बोललास...चूक झाली म्हणून तो माणूस देशद्रोही होता असं कसं म्हणणार?

   गोडसेंनी गांधींचा केलेला वध समर्थनीय आहे की नाही हा दुसरा मुद्दा. पण मला वाटतं अश्यावेळी राग "आपल्याच" माणसावर निघणार ना? जीनांनी देशाचे तुकडे पाडले...ते (त्यांच्या म्हणण्यानुसार...) त्यांच्या लोकांसाठी... गांधी तर "आपले" होते ना? शिवाय (मला असं वाटतं) गांधी राहिले तर अजून नुकसान होईल अशी काळजी त्याकाळात बऱ्याच लोकांना वाटत होती.

   असो...आपण ह्यातून शिकून पुढे जाऊ......अशी अशा करू!!!
   तू बरोब्बर बोललास यार..."ह्या चुका झाल्याही असतील तर हा इतिहास हेच शिकवतो कि ह्या चुका पुन्हा होता कामा नये."

   कमेंट झकास आहे मित्रा! धन्यवाद!!! :)

   Delete
 2. mihi ek gandhi virodhak asunahi hya lekhane mala vichar karayala bhag padale..
  kahi uttare patali aani kahi nahi...thanx for bringing it across...

  ReplyDelete
  Replies
  1. Thanks :) Please try to spread the link...let others too read the discussion. :)

   Cheers!!!

   Delete
 3. गांधीसारखा महात्मा सर्वसामान्य माणसासारखा आपल्या जीवाला जपत असताना स्वताच्या मुलाचा मात्र बळी देण्यास तयार होता.हि वस्तुस्थिती गांधी या मिथाकाशी कशा तर्हेने जुळवून घेता येईल.१९ नोव्हेंबर १९२१ ला गांधीनी विशिष्ट हेतूने देवदासला बोलावून घेतल्याचे जाहीर केले. जर पुन्हा दंगल पेटली तर स्वत: ऐवजी देवदासचा उपयोग कत्तली मध्ये बळी देण्यासाठी करण्याचे ठरवले.(शोध खंड २ पृ १११)

  ReplyDelete
 4. ‎1946 sali gandhi udagarle........a few lakhs might he killed in internecine warfare but real peace will come at least(shod khand 2 page484)kahi lakh lok martil hi bhasha gandhichya tondun kiti sulabhatene yete !!! gandhina ahinsa vadi grahit dharayach ka?konitari sangel ka?
  L

  ReplyDelete
 5. फाळणी झाली नसती तर गांधीहत्या झाली नसती.यासंदर्भात मला राममनोहर लोहिया यांचे भाष्य आठवते.ते म्हणतात..IT STRIKES ME AT THIS STAGE I HAVE ALMOST PROVED GANDHIJI TO BE A CURSE RATHER THAN A BLESSING TO THE COUNTRY......THERE IS INDEED A POSSIBILITY THAT INDIA WITHOUT GANDHIJI WOULD HAVE BEEN MORE HAPPILY PLACED AT LEAST IN THE SHORT RUN.

  ReplyDelete
 6. जगासाठी गांधीनी सत्य, अहिंसा,सत्याग्रह यांचा वारसा ठेवला.पण हिंदुस्तानासाठी मात्र फाळणी आणि हिंदू-मुस्लीम वैमनस्य याखेरीज काहीही ठेवलेले नाही.यांचे परिणाम आपण अजून भोगत आहोत,आणि अजून भोगावे लागतील.हे सत्य आहे.

  ReplyDelete
 7. ‎1946 sali gandhi udagarle........a few lakhs might he killed in internecine warfare but real peace will come at least(shod khand 2 page484)kahi lakh lok martil hi bhasha gandhichya tondun kiti sulabhatene yete !!! gandhina ahinsa vadi grahit dharayach ka?konitari sangel ka?

  ReplyDelete
 8. ९ जानेवारी १९३० च्या यंग इंडिया च्या अंकात गांधी लिहितात.....अगतिकपणे अनागोंदी पाहणे आणि कायमची गुलामी यामध्ये निवड करण्याची वेळ आली तर अवमान न करता मी सांगू इच्छितो कि हिंदुस्तानात अनागोंदी पाहणे तसेच हिंदू आणि मुसलमान एकमेकांच्या जीवावर उठलेले पाहणे हे हरघडी सोनेरी बेदीचा अनुभव घेण्यापेक्षा मी पसंत करीन.(शोध खंड २ पृ २९९)हीच मनीषा गांधीची होती. तर त्याच्या मृतुनंतर ५० वर्षांनीही ती अपेक्षेबाहेर सफल होत असल्याचे दृश्य दिसत आहे.गांधीना खरच अहिंसा वाडी समाजाव का?मला सांगाव मी त्यांचा ऋणी राहीन.

  ReplyDelete
 9. स्वताच्या जीवाच्या बाबतीत इतके हळवे असणारे गांधी दुसर्यांच्या जीवाशी कसे खेळत असत त्याचीही गांधी भक्तांनी नोंद घेण्यासारखी आहे.१९३० च्या सुमारास आश्रमातील ३ मुले देवीच्या रोगाला बळी पडली. इतरांनी त्यावर चिंता व्यक्त करून अन्तेवासिना लस टोचून घेण्याबद्दल गांधीची खूप आर्जवे केली.पण गांधी त्याला बधले नाही.ते म्हणाले, जी तत्वे आयुष्भर बाळगली, त्याचीच कसोटी लागली असता मी त्यांना पाठमोरा कसा होऊ?(शोध खंड २ पृ २९०-२९१) मुलामागून मुले मारत आहेत म्हणून हि तत्वे मागे घेऊ?(शोध खंड २ पृ २९०-२९१)अपेन्डीस्क चे opretion करून घेताना गांधींची तत्वनिष्ठा कोठे गेली होती? गांधीचे संपूर्ण जीवन तपासले तर स्व: सोडून इतरांच्या मरणाबद्दल त्याची विलक्षण स्थित्प्रद्य्नता आत्मसात केली होती असे दिसते.

  ReplyDelete
 10. गांधी म्हणतात.....जगाच्या रंगमंचावर ज्याच्या शब्दाचा प्रभाव पडतो असे १ राष्ट्र म्हणून जगातल्या कोणत्याही राष्ट्रापेक्षा श्रेष्ठ असा दर्जा आपल्याला मिळण्याआधी,एखाद्या हजारभर न्हवे तर हजारो निष्पाप ,निरपराध स्त्री पुरुषाच्या हत्येच्या शक्यतेचा विचार निर्विकार बुद्धीने करण्याची आपली तयारी हवी.(शोध खंड २ पृ ५३७) सर्वसाधारण पणे राष्ट्राच्या गौरवासाठी वीर पुरुषाकडून अपेक्षा केली जाते.पण गांधी निरपराध स्त्री पुरुषाच्या हत्याची,वीरांच्या बलिदानाची न्हवे शक्यता व्यक्त करतात,यांचे कारण काय असावे.

  ReplyDelete
 11. गांधी १पत्रात म्हणतात,
  प्रिय चारली,
  दिल्लीच्या दुखद घटनेमुळे मी २४ तास कमालीचा दुखी होतो. पण आता त्याबद्दल तितकाच आनंदी आहे.दिल्लीला सांडलेले रक्त निरपराध्याचे होते.दिल्लीच्या सत्याग्रहिनी चुका केल्या असतील हे शक्य आहे. तथापि त्यांनी एकंदरीत आपल्या लौकिकात भरच घातली आहे. त्यागाशिवाय मुक्ती नाही.१दिवशी पुरेसे माप घातले गेल्यामुळे मी हर्...षभरित झालो आहे आणि ते माप सैतानाची सत्ता ज्या ठिकाणी अधिक आहे त्याच ठिकाणी घातले गेले. माझ्या सुखात जर तुम्हाला सहभागी होता आले तर अवश्य व्हा.(शोध खंड १ पृ ३७०)
  गांधी भक्तांनी आणि गांधी वाद्यांनी गांधीनी खरोखरच अहिंसा गुण अंगिकारला होता का ?यांचे खुलासा करावा त्याचा मी हृनी राहीन
  Li

  ReplyDelete
 12. GANDHI SAID THAT IF A BLOOD BATH WAS NECESSARY IT WOULD COME ABOUT INSPITE OF NON VIOLENCE. I SAID THAT I WAS VERY SHOCKED TO HEAR SUCH WORDS FROM HIM.............GANDHI BHAKTANI SANGAV KI GANDHI KASE KAY AHINSA VADI HOTE.TYACHA ME HRUNI RAHIN.

  ReplyDelete
 13. omkar tuzya pipalkhare sarana hi prashnachi uttare vichar aani bhagh nirasan hot ka?aani ya page upload kar malhi vachata yeil.....aani mala hi kalatil ya prashnachi uttare.

  ReplyDelete
 14. भगतसिंग आणि गांधीजी याबद्द्लच्या सध्या सुरु असलेल्या अपप्रचाराबद्दल शोध घेत असताना तुमचा हा लेख सापडला. नक्कीच शेअर करावा असा आहे. सध्या गांधीचं नाव घेत गांधीवादाला मारुन टाकायचा जो काही प्रकार चालू आहे त्याला उत्तर देताना असे अभ्यासपूर्ण लेख उपयोगी पडतात.

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद. मी स्वतः अश्याच काही लेख, चर्चांमुळे गांधीद्वेषापासून मुक्त झालो. फाळणीवर एक उत्तम लेख आहे. आपणास आवडेल : http://expenziv.blogspot.in/2013/08/blog-post.html

   Delete
 15. गांधींनी पाकीस्तानला मुस्लीम राष्ट्र म्हणुन मान्यता होती का? आसल्यास हिंदुस्तानला हिंदु राष्ट्र घोषीत करण्यास काय हरकत होती.

  ReplyDelete