आरक्षण कसं अयोग्य आहे, खुल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांवर/नोकरदारांवर कसं अन्यायकारक आहे, आता “बढती”साठी सुद्धा आरक्षण म्हणजे किती गळचेपी आहे...अश्या गप्पा आपण नेहेमीच मारतो. उपयोग? मोठ्ठा शून्य!!!
मग आता अश्या चर्चा केल्यापेक्षा “सर्वांना मान्य असेल असं समाधान” तयार करून त्याची मागणी आपल्या नेत्यांना, संघटनांना करता येते का ते बघू.
आता आपण जे समाधान काढू ते “सर्वांना” मान्य असेल असं का असावं?
कारण अर्थातच साधं आहे...जे समाधान सर्वांना पटेल....तेच “मतांच्या” राजकारणात मान्य होईल...म्हणून!!!
“आर्थिक स्तरानुसार आरक्षण” संविधानाच्या कक्षेत बसत नाही. कारण आरक्षण “सामाजिक स्तरानुसार” देण्यात येतं...आणि सर्व घटकांचा “सामाजिक स्तर” समान व्हावा म्हणून देण्यात येतं. म्हणजेच आरक्षण देण्याचा हेतू "आर्थिक असमानता" नष्ट करणं हा नसून "सामाजिक असमानता" नष्ट करणं - हा आहे. आणि म्हणून आर्थिक स्तरावरून आरक्षण हे फक्त असंवैधानिकच नाही, तर आरक्षणाच्या मूळ उद्देशापासूनच दूर आहे.
शिवाय गरीब - श्रीमंत ह्यात फरक कसा करणार ?
म्हणजेच - ब्राह्मण / मराठा / महार / ओबीसी इ वर्गवारी - ह्या सगळ्या स्पष्ट आहेत. गरीब श्रीमंत वर्गवारी इतकी पक्की असते का ? नाही.
उदाहरणार्थ - गृहीत धर की महिना १०,००० पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या ला आरक्षण दिलं. १०,१०० असेल तर ? फक्त १००रु मुले त्याला आरक्षण नाही द्यायचं ? हे चूक नाही का ?
म्हणजेच - जातीची वर्गवारी क्लिष्ट नसते - म्हणून "सामाजिक समानता" आणण्यासाठी "जातीवरून आरक्षण" हा उपाय आहे. गरीब-श्रीमंती ही वर्गवारी तितकी सोपी नाही - म्हणून "आर्थिक असमानता" नष्ट करण्यासाठी "आरक्षण" हा उपाय योग्य नाही. त्यासाठी भरपूर रोजगार निर्मिती आवश्यक आहे.
मग ह्यावर उपाय काय ?

मला सुचत असलेला उपाय:
आपण पुढील मागण्या कराव्या:
१) आरक्षण हे त्या-त्या समाजाला प्रगतीची संधी मिळावी म्हणून देण्यात आलं. ही संधी २ पिढ्यांसाठी पुरेशी आहे!!! म्हणजेच...२ पिढ्यांनी आरक्षणाचा लाभ मिळवावा, प्रगती करावी...आणि गुणवत्ता वाढवावी. त्यापुढे त्यांना आरक्षणाची गरज नाही. म्हणून...प्रत्येक कुटुंबातील केवळ २ पिढ्यांना आरक्षणाचा लाभ मिळावा.
२) प्रत्येक प्रवेश प्रक्रियेमध्ये (शिक्षण आणि नोकरी...दोन्हीही) पहिल्या २ फेऱ्या फक्त “आरक्षित जागांसाठी” होतील. ह्या फेर्यानंतर उरलेल्या जागा खुल्या वर्गात जोडल्या जातील.
उपाय १ साठी एखादी राष्ट्रीय ओळख देणारी, कुटुंब आणि त्यातले सदस्य ह्यांची पूर्ण माहिती असणारी सिस्टीम तयार करावी लागेल. सध्या आधार च्या नोंदणी ज्या प्रकारे होत आहेत त्याच प्रकारे ह्या घडू शकतात. (आधार कार्ड भारतीय नागरिकत्वाचा पुरावा नाही...त्यामुळे हे कार्ड राष्ट्रीय ओळख म्हणून वापरता येईल की नाही ह्याबद्दल मी साशंक आहे)
आता ह्या मागण्या मान्य कश्या होणार?
“आरक्षण नको! बंद करा!!!” हे बोलताना आपण ‘आपली मागणी मान्य कशी होणार’ हा विचार करतो का? सरसकट आरक्षण बंद होणं काही प्रमाणात अयोग्य आणि अगदी “अशक्य” आहे. त्यामुळे कुठलातरी ‘मधला’मार्ग आवश्यक आहे...आणि तो वरील नियामान्द्वारे मिळू शकतो...असं मला वाटतं.
ह्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आपल्याला दोन मार्गाने प्रयत्न करावे लागणार...
“राजकीय” आणि “सामाजिक”
एकीकडे राजकीय लोकांना ही मागणी कळवून प्रयत्न करत राहणे आणि दुसरीकडे आरक्षित समाजातल्या आपल्या मित्राना समजावून सांगून जनमत बनवत राहणे.
अर्थात हे काही सोपं नाहीये! लगेच घडणारही नाही...! पण जी मागणी मान्य होणं “अजिबात शक्य नाही” {“आरक्षण नको! बंद करा!!!”} अशी मागणी केल्यापेक्षा...जी मागणी मान्य होऊ शकते...संविधानात बसते...अशी मागणी, अश्या मागणीचा प्रसार करायला काय हरकत आहे?
---
वरील मागणी १ - "फक्त २ पिढ्यांसाठी आरक्षण" बद्दल थोडंसं सविस्तर -
कुठलीही व्यक्ती आरक्षणाचा बहुतांश लाभ १०-१५ वर्षात मिळवते. पदवी/पद्व्योत्तर शिक्षण आणि नोकरी मिळण्याचा काळ.
कल्पना करा मी आरक्षित आहे - इंजिनिअरिंग, नंतर एमबीए आणि मग नोकरी - हे सगळं फार फार तर १० वर्षात झालं. त्यानंतर माझ्या वाटचा "पहिल्या पिढीचा लाभ" संपला. पुढे मला प्रमोशन इ साठी लाब मिळेल तेव्हा मिळेल. पुढील २० वर्षात माझी पुढची पिढी तयार होईल. म्हणजे ३०-३५ वर्षाच्या काळात - माझ्या वयाच्या आरक्षित समाजाच्या "संपूर्ण दोन पिढ्या" अनारक्षित कक्षेत येतील.
सगळ्यात महत्वाचं - ह्या दोन्ही पिढ्यांना उत्तम संधी मिळाल्यानंतर ते खुल्या वर्गात येतील. म्हणजेच "सामाजिक समानता" येण्याकडे वाटचाल सुरूच राहील - फक्त "एकच कुटुंब पिढ्यानपिढ्या आरक्षणाचा फायदा मिळवत आहे" हा सध्या होत असलेला फालतूपणा थांबेल.
ह्याच ३०-३५ वर्षात, प्रत्येक वर्षी काही...अश्या दराने आरक्षित समाज पुढे पुढे सरकत खुल्या वर्गात जोडल्या जाईल.
म्हणजेच - टप्प्याटप्प्याने आरक्षण कमी करणे - अगदी तेच इथे साध्य होतंय - फक्त ह्याची १००% हमी इथे आहे की प्रत्येक कुटुंबाला सामाजिक समानता मिळवण्याची संधी मिळाल्याशिवाय ते खुल्या वर्गात जोडल्या जाणार नाहीत.
---
म्हणजेच - मागासवर्गीयांवर कुठलाही अन्याय नं होता - आरक्षणाचा लाभ सर्वाना मिळवून देऊन, त्याची उपयुक्तता/गरज संपली, की ते आपोआप नाहीसं होईल.