आरक्षणाचा नवीन format


आरक्षण कसं अयोग्य आहे, खुल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांवर/नोकरदारांवर कसं अन्यायकारक आहे, आता “बढती”साठी सुद्धा आरक्षण म्हणजे किती गळचेपी आहे...अश्या गप्पा आपण नेहेमीच मारतो. उपयोग? मोठ्ठा शून्य!!!

मग आता अश्या चर्चा केल्यापेक्षा “सर्वांना मान्य असेल असं समाधान” तयार करून त्याची मागणी आपल्या नेत्यांना, संघटनांना करता येते का ते बघू.
आता आपण जे समाधान काढू ते “सर्वांना” मान्य असेल असं का असावं?
कारण अर्थातच साधं आहे...जे समाधान सर्वांना पटेल....तेच “मतांच्या” राजकारणात मान्य होईल...म्हणून!!!

“आर्थिक स्तरानुसार आरक्षण” संविधानाच्या कक्षेत बसत नाही. कारण आरक्षण “सामाजिक स्तरानुसार” देण्यात येतं...आणि सर्व घटकांचा “सामाजिक स्तर” समान व्हावा म्हणून देण्यात येतं. म्हणजेच आरक्षण देण्याचा हेतू "आर्थिक असमानता" नष्ट करणं हा नसून "सामाजिक असमानता" नष्ट करणं - हा आहे. आणि म्हणून आर्थिक स्तरावरून आरक्षण हे फक्त असंवैधानिकच नाही, तर आरक्षणाच्या मूळ उद्देशापासूनच दूर आहे.
शिवाय गरीब - श्रीमंत ह्यात फरक कसा करणार ?
म्हणजेच - ब्राह्मण / मराठा / महार / ओबीसी इ वर्गवारी - ह्या सगळ्या स्पष्ट आहेत. गरीब श्रीमंत वर्गवारी इतकी पक्की असते का ? नाही.

उदाहरणार्थ - गृहीत धर की महिना १०,००० पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या ला आरक्षण दिलं. १०,१०० असेल तर ? फक्त १००रु मुले त्याला आरक्षण नाही द्यायचं ? हे चूक नाही का ?

म्हणजेच - जातीची वर्गवारी क्लिष्ट नसते - म्हणून "सामाजिक समानता" आणण्यासाठी "जातीवरून आरक्षण" हा उपाय आहे. गरीब-श्रीमंती ही वर्गवारी तितकी सोपी नाही - म्हणून "आर्थिक असमानता" नष्ट करण्यासाठी "आरक्षण" हा उपाय योग्य नाही. त्यासाठी भरपूर रोजगार निर्मिती आवश्यक आहे.

मग ह्यावर उपाय काय ?

मला सुचत असलेला उपाय:
आपण पुढील मागण्या कराव्या:
१)      आरक्षण हे त्या-त्या समाजाला प्रगतीची संधी मिळावी म्हणून देण्यात आलं. ही संधी २ पिढ्यांसाठी पुरेशी आहे!!! म्हणजेच...२ पिढ्यांनी आरक्षणाचा लाभ मिळवावा, प्रगती करावी...आणि गुणवत्ता वाढवावी. त्यापुढे त्यांना आरक्षणाची गरज नाही. म्हणून...प्रत्येक कुटुंबातील केवळ २ पिढ्यांना आरक्षणाचा लाभ मिळावा.
२)      प्रत्येक प्रवेश प्रक्रियेमध्ये (शिक्षण आणि नोकरी...दोन्हीही) पहिल्या २ फेऱ्या फक्त “आरक्षित जागांसाठी” होतील. ह्या फेर्यानंतर उरलेल्या जागा खुल्या वर्गात जोडल्या जातील.

उपाय १ साठी एखादी राष्ट्रीय ओळख देणारी, कुटुंब आणि त्यातले सदस्य ह्यांची पूर्ण माहिती असणारी सिस्टीम तयार करावी लागेल. सध्या आधार च्या नोंदणी ज्या प्रकारे होत आहेत त्याच प्रकारे ह्या घडू शकतात. (आधार कार्ड भारतीय नागरिकत्वाचा पुरावा नाही...त्यामुळे हे कार्ड राष्ट्रीय ओळख म्हणून वापरता येईल की नाही ह्याबद्दल मी साशंक आहे)

आता ह्या मागण्या मान्य कश्या होणार?
“आरक्षण नको! बंद करा!!!” हे बोलताना आपण ‘आपली मागणी मान्य कशी होणार’ हा विचार करतो का? सरसकट आरक्षण बंद होणं काही प्रमाणात अयोग्य आणि अगदी “अशक्य” आहे. त्यामुळे कुठलातरी ‘मधला’मार्ग आवश्यक आहे...आणि तो वरील नियामान्द्वारे मिळू शकतो...असं मला वाटतं.
ह्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आपल्याला दोन मार्गाने प्रयत्न करावे लागणार...
“राजकीय” आणि “सामाजिक”

एकीकडे राजकीय लोकांना ही मागणी कळवून प्रयत्न करत राहणे आणि दुसरीकडे आरक्षित समाजातल्या आपल्या मित्राना समजावून सांगून जनमत बनवत राहणे.

अर्थात हे काही सोपं नाहीये! लगेच घडणारही नाही...! पण जी मागणी मान्य होणं “अजिबात शक्य नाही” {“आरक्षण नको! बंद करा!!!”} अशी मागणी केल्यापेक्षा...जी मागणी मान्य होऊ शकते...संविधानात बसते...अशी मागणी, अश्या मागणीचा प्रसार करायला काय हरकत आहे?

---

वरील मागणी १ - "फक्त २ पिढ्यांसाठी आरक्षण" बद्दल थोडंसं सविस्तर - 

कुठलीही व्यक्ती आरक्षणाचा बहुतांश लाभ १०-१५ वर्षात मिळवते. पदवी/पद्व्योत्तर शिक्षण आणि नोकरी मिळण्याचा काळ.
कल्पना करा मी आरक्षित आहे - इंजिनिअरिंग, नंतर एमबीए आणि मग नोकरी - हे सगळं फार फार तर १० वर्षात झालं. त्यानंतर माझ्या वाटचा "पहिल्या पिढीचा लाभ" संपला. पुढे मला प्रमोशन इ साठी लाब मिळेल तेव्हा मिळेल. पुढील २० वर्षात माझी पुढची पिढी तयार होईल. म्हणजे ३०-३५ वर्षाच्या काळात - माझ्या वयाच्या आरक्षित समाजाच्या "संपूर्ण दोन पिढ्या" अनारक्षित कक्षेत येतील.

सगळ्यात महत्वाचं - ह्या दोन्ही पिढ्यांना उत्तम संधी मिळाल्यानंतर ते खुल्या वर्गात येतील. म्हणजेच "सामाजिक समानता" येण्याकडे वाटचाल सुरूच राहील - फक्त "एकच कुटुंब पिढ्यानपिढ्या आरक्षणाचा फायदा मिळवत आहे" हा सध्या होत असलेला फालतूपणा थांबेल.
ह्याच ३०-३५ वर्षात, प्रत्येक वर्षी काही...अश्या दराने आरक्षित समाज पुढे पुढे सरकत खुल्या वर्गात जोडल्या जाईल.
म्हणजेच - टप्प्याटप्प्याने आरक्षण कमी करणे - अगदी तेच इथे साध्य होतंय - फक्त ह्याची १००% हमी इथे आहे की प्रत्येक कुटुंबाला सामाजिक समानता मिळवण्याची संधी मिळाल्याशिवाय ते खुल्या वर्गात जोडल्या जाणार नाहीत.
---
म्हणजेच - मागासवर्गीयांवर कुठलाही अन्याय नं होता - आरक्षणाचा लाभ सर्वाना मिळवून देऊन, त्याची उपयुक्तता/गरज संपली, की ते आपोआप नाहीसं होईल.

9 comments:

 1. far changala upaay aahe omkaar... prakash aambedkaranna he patraane kalav ...

  ReplyDelete
 2. मुळातच 'आरक्षण' ही संकल्पना अनैसर्गिक आहे. प्रशासन व राज्यकर्ते कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक असतील तर समाजातील कोणताही घटक दुर्बल अथवा पीडित राहणार नाही, हे पाहण्याचे उत्तरदायित्व त्यांचे राहील. त्यामुळे आरक्षणाची गरज भासणारच नाही. आरक्षण म्हणजे अपात्र किंवा तुलनेने अल्प पात्र व्यक्तीला पद देणे व पात्र व्यक्तीला नाकारणे.

  ReplyDelete
  Replies
  1. Sanjog A. Tilak , सध्या अस्तित्वात असलेला तिढा सोडवायचा कसा हा मुद्दा आहे. बऱ्याचदा प्राप्त परिस्थितीत "योग्य कि अयोग्य" हे बोलून फायदा नसतो. आरक्षण योग्य की अयोग्य हे बोलून काहीच उपयोग नाही. सध्याच्या आरक्षणामुळे ना दलित/मागासवर्गीयांचं भलं होतंय ना खुल्या वर्गाचं.
   मग करायचं काय ? - हा प्रश्न आहे, मी वर माझ्या परीने उत्तर दिलंय - एक पर्याय दिलाय. तुमच्या कडे कुठला अमलबजावणी होऊ शकेल पर्याय/उपाय आहे का ?

   Delete
  2. आरक्षण सरसकट नाही, पण टप्प्या टप्प्याने पूर्ण रद्द करणे. शिक्षणाच्या क्षेत्रात स्थानिक प्रशासनाने पुढाकार घेऊन पात्र पण आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे. महसुलातून उत्पन्न झालेला पैसा बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी वापरणे असे उपाय योग्य आहेत. पण आरक्षण नव्हे. आपण म्हणता तो उपायही राजकीय इच्छाशक्ती अभावी पूर्णत्वास जाणे कठीण आहे, कारण आरक्षणामुळे राज्याकर्त्यांना सामाजिक विषमता अबाधित ठेऊन त्यावर स्वत:ची पोळी भाजून घेणे सोपे जाते. त्यामुळे एखादा राष्ट्रनिष्ठ व समाजहितैषी राज्यकर्ता असेल, तर तो मुळापासून आरक्षण विषवल्ली उपटून टाकेल.
   Superficial measures will serve to a particular group or for a particular time period and never for the society as a whole and on a long term basis.

   Delete
  3. कुठलीही व्यक्ती आरक्षणाचा बहुतांश लाभ १०-१५ वर्षात मिळवते. पदवी/पद्व्योत्तर शिक्षण आणि नोकरी मिळण्याचा काळ.
   कल्पना करा मी आरक्षित आहे - इंजिनिरिंग, नंतर एमबीए आणि मग नोकरी - हे सगळं फार फार तर १० वर्षात झालं. त्यानंतर माझ्या वाटचा "पहिल्या पिढीचा लाभ" संपला. पुढे मला प्रमोशन इ साठी लाब मिळेल तेव्हा मिळेल. पुढील २० वर्षात माझी पुढची पिढी तयार होईल. म्हणजे ३० वर्षाच्या काळात - आरक्षित समाजाच्या "संपूर्ण दोन पिढ्या" अनारक्षित कक्षेत येतील.
   सगळ्यात महत्वाचं - ह्या दोन्ही पिढ्यांना उत्तम संधी मिळाल्यानंतर ते खुल्या वर्गात येतील. म्हणजेच "सामाजिक समानता" येण्याकडे वाटचाल सुरूच राहील - फट एकच कुटुंब पिढ्यान्पिढ्या फायदा मिळवत आहे हे थांबेल.

   ह्याच ३० वर्षात, प्रत्येक वर्षी काही...अश्या दराने आरक्षित समाज पुढे पुढे सरकत खुल्या वर्गात जोडल्या जाईल.

   म्हणजेच आपण जे म्हणताय - टप्प्याटप्प्याने आरक्षण कमी करणे - अगदी तेच इथे साध्य होतंय - फक्त ह्याची १००% हमी इथे आहे की प्रत्येक कुटुंबाला सामाजिक समानता मिळवण्याची संधी मिळाल्याशिवाय ते खुल्या वर्गात जोडल्या जाणार नाहीत.
   ---

   म्हणजेच - मागासवर्गीयांवर कुठलाही अन्यास नं होता - आरक्षणाचा लाभ सर्वाना मिळवून देऊन, त्याची उपयुक्तता/गरज संपली, की ते आपोआप नाहीसं होईल.

   Delete
 3. नेहमीच लोक एकतर आरक्षणाच्या विरोधी किंवा बाजूने उभे असतात. तुम्ही जे उपाय सुचवले आहेत, मधला मार्ग काढण्याचा जो प्रयत्न केला आहे तो खरच विचार करण्यासारखा आहे. पण त्याने सर्व प्रश्न सुटतील असे नाही. इथे जाती व्यवस्थे बद्दल तुम्ही सांगितले नाही. ज्यामुळे जातीव्यवस्था संपेल असे उपाय पण आपण सर्वांनी मिळून शोधले पाहिजेत. मूळ मुद्दा जाती व्यवस्थेचा आहे. ज्यामुळे हा फेरा सुरु झाला. आजकाल सर्व गणितं जातीभोवती फिरतात. हे संपलं पाहिजे.

  ReplyDelete
 4. दोन पिढ्यांना आरक्षण द्यायचे नंतर टप्या टंप्याने बंद करायचे पण दोन पिढ्यात समाज सुसंस्कुरत होतो का एक पद्धत असते आजोबा झाड लालतो ती त्याच्या नातवासाढी पन दोन पिढ्यांना आरक्षण मिळाल्यानंतर सहाजीकच तो आरक्षण बंद ला विरोध करनार आपण चार सामान्य लोक चर्चा करत आहोत पण अशा एकेक असामांन्य संघटना आहेत त्यांची भाषा ईतकी हलक्या स्तराची कि आपण त्या पातळीवर जाऊ शकत नाही आरक्षण कायम करने बंद करने हा राजकिय क्षेत्राशी निगडित आहे मतपेढीचे राजकारण समानता कधी येऊ देणार नाही फोडा आणी झोडा या ईंग्रजांच्या संकल्पनेने ईग्रजांनी व कांग्रेसने देशावर राज्य केले बहुतेक ब्रिटिशांनीच जातीनिहाय जनगनना १९११ पासुन चालु केली ईथेच आरक्षणाची बिजे आहेत १०० ते १२५ वर्षाचे आरक्षण व १००० वर्षाचे सप्रेशन दोन पिढ्यात संपेल का

  ReplyDelete
  Replies
  1. अतुल, आपल्या कमेंटला मुद्यानुसार रिप्लाय देतोय.

   १) दोन पिढ्यांना आरक्षण द्यायचे नंतर टप्या टंप्याने बंद करायचे पण दोन पिढ्यात समाज सुसंस्कुरत होतो का
   --- आरक्षण लोकांना सुसंस्कृत करण्यासाठी नाहीये. लोकांना त्यांचा सामाजिक स्तर उंचावण्याची योग्य संधी संधी देण्यासाठी आहे. दोन पिढ्यांना चांगले शिक्षण, चांगली नोकरी इ मुळे चांगला सामाजिक स्तर प्राप्त होतो - कारण साधारणपणे लोक - ह्याचे वडील कोण आहेत आणि हा कोण आहेत - ह्यावरून कुटुंबाची सामाजिक परत बघतात. (लोकांचा हा प्रकार चुकीचा आहे...पण असा आहे...काय करणार !)

   २) एक पद्धत असते आजोबा झाड लालतो ती त्याच्या नातवासाढी पन दोन पिढ्यांना आरक्षण मिळाल्यानंतर सहाजीकच तो आरक्षण बंद ला विरोध करनार आपण चार सामान्य लोक चर्चा करत आहोत पण अशा एकेक असामांन्य संघटना आहेत त्यांची भाषा ईतकी हलक्या स्तराची कि आपण त्या पातळीवर जाऊ शकत नाही आरक्षण कायम करने बंद करने हा राजकिय क्षेत्राशी निगडित आहे मतपेढीचे राजकारण समानता कधी येऊ देणार नाही फोडा आणी झोडा या ईंग्रजांच्या संकल्पनेने ईग्रजांनी व कांग्रेसने देशावर राज्य केले बहुतेक ब्रिटिशांनीच जातीनिहाय जनगनना १९११ पासुन चालु केली ईथेच आरक्षणाची बिजे आहेत

   --- अगदी बरोबर. पण आपण चार लोक "आरक्षण" हा विषय जेव्हा जेव्हा निघेल, तेव्हा तेव्हा वरील ब्लॉग मधलं लॉजिक इतरांना सांगू शकतो. आपल्या आसपासचे "चांगले" विचारवंत, नेते, ह्यांना हे पटवून देऊ शकतो. हो ना? - म्हणजे तुम्ही आणि मी, मराठा आरक्षण, ब्राह्मण आरक्षण - ह्यावर नं भांडता, सोबत - दोन पिढ्यांसाठी आरक्षण - ह्याचा प्रचार करू शकतो. हो न? - वेळ लागेल - पण हाच योग्य उपाय नाही का?

   ३) १०० ते १२५ वर्षाचे आरक्षण व १००० वर्षाचे सप्रेशन दोन पिढ्यात संपेल का ---

   ह्याचा विचार दोन प्रकारे करावा - १००० वर्षांचं सप्रेशन सध्याच्या आरक्षणाने संपत आहे का? नाही. का नाही - कारण मोजक्याच कुटुंबाच्या लोकांना आरक्षणाचे लाभ मिळतात. ते वरील सिस्टीममुळे थांबेल.

   दुसरं असं की आरक्षण मुळे सगळ्या समस्या सुटू शकत नाहीत. कारण आपली सिस्टीमच भ्रष्ट आहे. ती समूर्ण सुधारण्यासाठी इतर काही चांगले बदल करावे लागतील.

   Delete