प्रिय गणपती बाप्पास...


नमस्कार बाप्पा!

वर्षभरानंतर भेटतोयेस ! खूप miss केलं आम्ही तुला.

{दंतावळ उठून गेलेल्या, परंतु एखादाच दात असलेल्या माणसासारखी माझी इंग्रजी! खूप अप्रूप वाटतं ह्या भाषेचं. पण अस्खलित येत नाही! म्हणून मराठीत लिहितोय...नाहीतर कोण लिहितंय आजकाल मराठीत? आम्हाला "आमची मराठी" ही "माय" कुठे वाटतीये आजकाल? आता आम्हाला "My English" ची काळजी वाहावी लागतीये...अरे अरे...काय मी लगेच serious गप्पा सुरु केल्या? Sorry हं!!!}

हा तर... Welcome बाप्पा! मनापासून welcome!!!

आता तुझी खूप मजा आहे डझनभर दिवस! रोज रोज आरती काय, मोदकाचा प्रसाद काय...! झकास दिवस आलेत ना तुझे! कर बाबा मजा...बारा महिन्यात हे बारा दिवस तुला वाहिले आमच्या पूर्वजांनी. तश्या चतुर्थी असतात म्हणा. पण तुझा "उत्सव" काय तो हाच! नाही का?

पण आम्ही फक्त तुझंच कौतुक करतो असं काही नाही बरं !

आता महालक्ष्मी आहेत...दसरा आहे..दिवाळी आहे...भरपूर देव आणि भरपूर सण आमचे !!! आम्ही आहोतच भाविक आणि सोशिक!

मजेत आहेस ना बाबा ? बारा महिने फारसं लक्ष नव्हतं तुझ्याकडे...माफ कर हा! पण तू आमचा खूप लाडका आहेस हे तर तुला माहितीये ना? मग?!

बरं पत्र लिहिण्यास कारण काय ते सांगतो. तुला जरा warning द्यायची होती.

कसं आहे, आपला देश प्रवास करतोय. "गोरे ते काळे"...असा आमचा प्रवास सुरु आहे.

म्हणजे आधी "गोरे" त्रास द्यायचे , आता "काळे" त्रास देतात.

आधी "गोरे" कर्म करणाऱ्यांना मान मिळायचा. आता "काळे" धंदे करणाऱ्यांची "चलती" आहे.

तसा तू प्रत्येक वर्षी येतोसच, त्यामुळे हा फरक तू दरवर्षी अनुभवला असशीलच! पण मी आपलं सांगण्याचं काम करतोय! तर सध्या परिस्थिती नाजूक आहे. जरा जपून!


काय म्हणतोस...?  "परिस्थिती आधीपासूनच नाजूक होती" ?
LOL...! :D
अगदी बरोबर बोललास देवा! "Like" आणि "+1"!!!

{LOL...ह्याचा अर्थ माहितीये ना? Google कर माहीत नसेल तर. आम्ही एकमेकांना अश्या गोष्टी विचारणं कधीच बंद केलंय! Now don't tell me you don't know what "Google" means! x-( }


पण परिस्थिती आता अधिक गंभीर झालीये. मी म्हणालो तसं गोरे-ते-काळे हा प्रवास फक्त नेते किंवा कारकून किंवा सरकारी Doctor/वकील/इतर कर्मचारी किंवा पोलीस... ह्यांच्यातच नाही, तर "आमच्या"...मध्ये झालाय...आम्हा सर्वांमधे!!! आम्ही आता निर्लज्ज झालो आहोत. त्यामुळे आता आम्ही नाही रे..."तू" काळजी घे बाबा! कुठे, कधी, काय "फुटेल" काही सांगता येत नाही!!!
अरे..."फुटणं" म्हणजे फक्त "Bomb फुटणं" असं नाही बाप्पा! {lol...तू आम्हाला ओळखलं नाहीस अजून!!!} एखाद्याचं डोकं...एखादं धरण, एखादा रस्ता...एखादी "बाटली"... तुझ्या समोर कधीही काहीही फुटू शकतं! आणि तुला ते देखवणार नाहीरे! आमच्या भावना मेल्या आहेत. लाज मेली आहे. काळजी मेली आहे. पण तू देव आहेस नं! तुला वाईट वाटेल...! म्हणून सांगतोय!

बाकी रस्ता "फुटू शकतो" हे आमच्याच {रस्ता बनवणाऱ्या} लोकांनी सप्रमाण सिध्द केलंय बरं! आणि...फुटलेला रस्ता...वर्षानुवर्षे... तसाच राहू शकतो...त्यात कितीही अपघात घडले तरी...हे देखील {रस्ता वापरणाऱ्या!!!} "आम्हीच" सिध्द केलंय!!!

"बाटली" बद्दल बोलू की नको? कारण तुझं आगमनंच "तरल द्रव्याच्या घमघमाटात" होतं आजकाल. ती मिरवणूक "आपल्या गणरायाचं आनंदपूर्वक स्वागत!" अश्या स्वरूपातून "बेधुंद डोक्याच्या लहरींचं प्रदर्शन" अश्या स्वरूपात कधी गेली कळालंच नाही. तुझी प्रतिष्ठापना केलेल्या मंडपात एकेकाळी लोकमान्यांना हवं असलेलं युवा संगठन झालं. देशसेवेच्या आणाभाका घेतल्या गेल्या. आपलं जीवन समाजासाठी अर्पण करण्याची तयारी असणाऱ्यांनी, बाप्पा, तुझ्यासमोर-तुझ्यासाक्षीने मोठ मोठी स्वप्न बघितली...स्वतःच्या जीवनाशी खेळलेला जुगारच होता तो! त्याच तुझ्या मंडपात आता बर्याच ठिकाणी पत्ते ठाण मांडून बसलेत! खेळ जुगाराचाच...स्वरूप किती बदललं !!!

तर हे असं सगळं बदललं आहे...त्यामुळे...जरा जपूनच राहा बाबा!!!


आणि हा...बाप्पा, रागावणार नसशील तर...एक प्रश्न विचारायचाय!!!!

हे जे मी तुला सांगोतय, ही जी समस्यांची बजबजपुरी माजलिये...ती तुला दिसत नाही का रे? मला हे पत्र लिहिण्याची गरज भासावी, तुझं "इकडे...अस्मादिकांकडे" लक्ष नाहीये, इथल्या परिस्थितीची माहितीच नाहीये असं मला वाटावं अशी वेळ का यावी माझ्यावर?

वर्षानुवर्षे आम्ही तुला पुजतोय, तुझी भक्ती करतोय...अगदी मनापासून. आमच्या देशाचं कर्तुत्व नुकतच कुठे जगासमोर येतंय. पण आमचा सोशिकपणा, आमच्या लाडक्या दैवतांची आम्ही केलेली भक्ती...कौतुकाने साजरे केलेले सण...हे अख्ख जग जाणून आहे. तू कुठल्या का रूपात असेना...गजानन, ओंकार स्वरूप अनादी अनंत...किंवा एक " देव" किंवा...अल्लाह, GOD...किंवा कुणीही...तू कुणाचंही रूप घे...तुझ्या प्रत्येक रूपाची/स्वरूपाची आराधना ह्या देशात झालीच आहे. मग तरीपण इथे असं का होतंय गजानना?

आम्ही कुठे चुकलो रे?

आम्ही मुर्ख आहोत बाप्पा...आमचे "जातभाई"...आमची "माणसं" उपासमारीने मरतायेत...कितीतरी छोटी मुलं केवळ योग्य वैद्यकीय उपचार न मिळाल्याने अपंग होतायेत किंवा जीव गमावतायेत...
आणि आमचं..."माणुसकीचं network मजा मारण्यात व्यस्त आहे".

पण तू तर "माणूस" नाहीस ना? आमचे problems दिसतात ना तुला? ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणारे 
काही मोजकेच लोक दिसतात ना तुला? त्यांना मदत का नाही करत तू?

कित्येक RTI activists देवाघरी गेलेत. oops...तुझ्याकडेच आले असतील ना? त्यांच्याकडून इकडची कथा ऐकली असशील की!!!?

भ्रष्टाचाराबद्दल तर १०० पानं लिहू शकतो प्रत्येक भारतीय...जाउदे. तुला देखील अजीर्ण झालं असणारे ह्या शब्दाचं.


की तुला अजीर्ण झालंय...आमच्या सगळ्याच समस्यांचं?

बोल ना!!!!!!

गेली कित्येक दशकं आम्ही वाट बघतोय...तुझ्या बोलण्याची.

भगवद्गीतेमध्ये म्हटलंय ना "यदा यदाही..."...मग? अजून किती ग्लानी यायला हवी आहे? अरे ग्लानी येऊन जमाना होऊन गेला. आता कोमा मध्ये गेलाय आमचा "मनुष्य" धर्म.
लवकरच प्राण ही गमावून बसेल.

आणि तू अजूनही बोलायला तयार नाहीयेस!

माझी आई तुझी अपरंपार भक्ती करते. पण तिला त्याचं फळ काय मिळालं असा प्रश्न पडतो मला. Spondilitis झालाय. बालपणापासून बघतो मी तिच्या वेदना. गेली २० वर्ष ती हेच भोगतीये. रोज. अगदी रोज.

आणि तिला होत असलेला त्रास कसा कमी करता येईल हा विचार बाबा आणि मी करत असतो. रोज. अगदी रोज.

खूप प्रयत्न केले. काही उपयोग झाला नाही.

पण तरीसुद्धा ती तुझा ध्यास सोडायला तयार नाही.

तुला तिची प्रार्थना कधीच ऐकू नाही आली? वेदना दिसल्या नाहीत?

अगदी असंच आमच्या देशाचं, समाजाचं झालंय.

बाप्पा...जे लोक इतरांना त्रास देतात त्यांचं दमन आणि इतरांचं रक्षण...असं काहीसं तुझं ब्रीद आहे म्हणतात. लोकांना सद्बुद्धी देणं हे तुझं प्रमुख काम.

पण ते ब्रीद activate कधी होणार? आणि लोकांना सद्-बुद्धी कधी मिळणार?


अरे बोल ना...काही तर बोल????

5 comments:

 1. खूप छान आहे रे आणि सगळ्याचा बाबतीत खूप विचार कार्याला ... लावणारे आहे बाप्पा ला पण ... असो असे लिहित जा my best wishes (हल्ली हे पण eng मधून बोलावे लागेत ...)

  ReplyDelete
 2. इतक्या निरागसपणे हल्ली कोणी व्यक्त पण होत नाही , माणूस तर सोड पण देवा पुढे हि नाही. प्रत्येकाचा आत्मा इतका क्लेशकारी झालाय कि ते पावित्र्य हरवले आहे. काळजाला हात घालणारी आणि स्पंदने जागवणारी हाक बाप्पा नक्की ऐकेल असा मला विश्वास आहे. मस्त लिहिले आहेस.

  ReplyDelete
 3. कदाचित बाप्पा पण खूप दिवसा आधीच हुशार झाला असेल....तो पण आता स्वतः या चाक्रव्हुहात न येता वरूनच सगळा खेळ पाहण्यामध्ये शहाणपणा आहे असे समजत असेल...म्हणत असेल "माणसांनो तुम्ही लाज सोडलीत , तात्पुरत्या गणपती सोहळ्याच्या साजरीकरनाच ढोंग घेऊन माझ्या प्रतेमेआड काही पण करून मला कशाला पापात पाडता...राहा तुम्ही त्या POP च्या मुर्त्यांसोबत.."....बाप्पा....माफ कर रे सगळ्यांना...
  http://itsme-akshay.blogspot.in/

  ReplyDelete