हिंदू धर्माविरुद्ध कारस्थानं कशासाठी

आधीच हे स्पष्ट करतो की मी मूळ पोस्टशी सहमत नाही. सनातन इ चं थोतांड आणि आसाराम सारखे "संत" माझ्यासाठी त्याज्यच आहेत. भारतीय/हिंदू संकृती टिकावी असं वाटतंच पण Valentine Day च्या दिवशी कुणी दंगा घातला, कुठल्या सेनेने कुठल्या पब मध्ये धिंगाणा घातला तर ते मला असह्यच होतं.

फक्त "हिंदू धर्माविरुद्ध इतरांची कारस्थानं" ह्याबद्दल बोलतोय. मी पुढे जे लिहितोय ते कदाचित हास्यास्पद वाटेल - मी देखील एक-दीड वर्षांपूर्वी हसलो होतो. पण हळू हळू पटायला लागलं.
---
मिडीया कधीही मुल्ला मौलवी आणि पादरी फादर ह्यांची लफडी दाखवत नाही, हिंदूंच्या बाबतीत जरा कुठे खुट्ट वाजलं की सगळे चवताळून उठतात आणि इतरांच्या चुका झाकल्या जातात - ही वस्तुस्थिती आहे. ( - आपण देखील हे मान्य कराल.)
हे सगळं मिडीया का करते ? कोण पैसा पुरवतं ह्यासाठी ? कशासाठी ही उठाठेव ?

ह्यामागे मोठं आर्थिक गणित आहे. अमेरिकेवर आणि इंग्लंडवर काही मोजक्याच corporate houses ची सत्ता आहे. कृपया हे वाचा आणि बघा.

१) http://en.wikipedia.org/wiki/The_Obama_Deception:_The_Mask_Comes_Off

२) http://en.wikipedia.org/wiki/Committee_of_300

३) http://www.youtube.com/watch?v=eAaQNACwaLw

असे अनेक links आणि व्हिडीओ मिळतील. वरील दोन्ही links वरून New World Order वगैरे गोष्टी नीट लक्षात येतील. ह्या corporate housesना कुणी इल्युमिनाटी म्हणतं तर कुणी Bilderberg Group कुणी आणखी काही. मागे एक भारीच फोटो बघितला होता, तो इथे देतोय -ह्या सगळ्या गोष्टी आजकाल अनेक वेबसाईटसवर दिल्या जात आहेत.
एक चांगली वेबसाईट इथे देत आहे - http://www.pseudoreality.org/

मला स्वतः ला ह्या सगळ्या गोष्टी जरा अवास्तव वाटतात. हे सगळं अगदी तंतोतंत खरं असेलच असं नाही. परंतु आर्थिक वर्चस्व मिळवण्यासाठी वेगवेगळ्या कंपनी वेगवेगळ्या प्रकारे एकमेकांना मदत करत असतात हे तर अगदी खरं आहे. वरील सगळ्या गोष्टी देण्यामागचा उद्देश आहे आपल्या हे नीट लक्षात येणं की Corporate Lobbies अस्तित्वात आहेत. आणि काही मोजकेच अत्यंत अत्यंत अत्यंत प्रभावशाली लोक एकत्र आले तर त्यांना हवं ते घडवून आणू शकतात.

तर ह्यांचा, म्हणजेच ह्या Corporate Lobbies चा एकूण plan आहे सगळ्या जगावर त्यांचं आधिपत्य करणं.

आणि ह्या plan / प्रयत्नांमध्ये "धर्म" फार मोठी कामगिरी बजावतो. प्रत्येक धर्म एक विचार, एक संस्कृती निदर्शित करतो. आणि एकसारखे विचार / संस्कृती असणारे लोक एकमेकांना 'जवळचं' समजतात. त्या जवळच्या लोकांबद्दल जिव्हाळा वाटायला लागतो. आणि अश्या लोकांना आपलंसं करणं - त्यांच्यावर अधिकार गाजवणं - सोपं जातं. इथे धर्म कामी येतो.

तसं वरील corporate houses ना - ना धर्माशी देणं घेणं आहे ना संकृतीशी. त्यांना फक्त "पसरायचं" आहे. हे पसरणं ख्रिश्चन धर्माच्या प्रसाराने सोपं होतं - म्हणून corporate houses मिशनर्यांना पैसा आणि इतर मदत करतात.

इस्लामचा प्रसार ह्याच corporate houses च्या मदतीने झाला आहे.
आता ह्यावर दोन प्रश्न आहेत - १) कसा  काय आणि २) का

१) कसा काय - इस्लामी जेहाद उभा कसा झाला हे आपल्याला माहित आहे - अमेरिकेने छुप्या समर्थनाने उभा केलेला हा राक्षस आता अमेरिका आणि ख्रिश्चन धर्माविरुद्ध थैमान घालतोय. बरं आज ह्या जेहादचे अर्थकारण बंद करणं आणि आवळून काढणं अमेरिकेला शक्य नाही का ? अगदी सहज शक्य आहे. तरी ते तसं करत नाहीत !
२) का - हे corporate houses नेमके आहेत कोण ? शस्त्रास्त्र कारखाने, मिडीया कंपनीज्, मोठ्या एमएनसीज् इ. ह्यांनी जगभरात आपलं वर्चस्व ठेवण्यासाठी २ रस्ते वापरले आहेत - शस्त्र आणि डॉलर. 

No comments:

Post a Comment