राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांसाठी - क्रिकेटचा एक धडा !

Click here to read English Version of this post.

AAP आणि BJP वाल्यांचं Arrogance…
हिंदुत्व आणि समानता वाद्यांची दांडगाई…
राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांसाठी - क्रिकेटचा एक धडा !

हर्षा भोगले स्वतः निष्णात क्रिकेटपटू नाहीत. पण आज भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात क्रिकेट विश्लेषकांचे शिरोमणी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या एका भाषणात ते म्हणतात, "If anything that stops Indian Cricketers becoming from becoming 'good' to 'great', then that's ONE question - 'How much Cricket have you played?'. When I entered into this profession, Everyone asked me this question - 'How much Cricket have you played?'. भारतीय क्रिकेट विश्वातलं हे arrogance भारतीय क्रिकेटपटूंना "ग्रेट क्रिकेटर्स" होण्यापासून थांबवतंय असं हर्षा म्हणतात.

हाच arrogance राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांना आमच्या देशाला "ग्रेट नेशन" बनवण्यापासून रोखतोय.

BJP असो की AAP - तुम्ही त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रश्न विचारा, सल्ला/सुचना द्या आणि ते त्यावर विचार किंवा आत्मपरीक्षण नं करता प्रतिप्रश्न करतील - How much Politics have you played ? म्हणजे एक त्रयस्थ म्हणून तुम्ही विचार कराल, मत मांडाल - तर तुम्ही मूर्ख आहात. जर तुम्ही राजकारणाच्या गटारात (- 'राजकारणाचं गटार' हे माझ्या एका "आप" वाल्या मित्राचं patent आहे) उतरलेले असाल तरच तोंड उघडा नाहीतर खबरदार !

ह्या AAP वाल्यांना स्वराज आणि जनलोकपाल बद्दल प्रश्न विचारा…धूम ठोकून पळ काढतात. ह्यांच्या केजरीवाल साहेबांनी त्यांच्या 'स्वराज' पुस्तकात लोकपाल वर राईट टू रिकॉल चं वचन दिलं होतं पण जनलोकपाल बिलमध्ये राईट टू रिकॉल नाहीये - हे कितीही सांगितलं तरी तुम्हाला ignore केलं जातं. म्हणजे - स्वतःच्या अजेंडा बद्द्ल धड काही माहीत नाही आणि त्याबद्दल वरिष्ठांना प्रश्न विचारायची हिम्मतही नाही पण "मग मत काय काँग्रेस किंवा भाजपा सारख्या चोरांना देणार काय?" असं विचारताना लाज नाही वाटत.

एका भाजपाच्या वरिष्ठ नेत्यानी मला म्हटलं "आम्ही का ऐकावं तुमचं ? तुम्ही ना काँग्रेस चे ना भाजपा चे ! चौकात बसून खड्डे मोजत बसता". मी विचारात पडलो…अरे सगळे भाजपा किंवा काँग्रेस चे असायलाच पाहिजे काय ? "देशाचे" नावाची कुठली जमात आहे की नाही ? भाजपाचा एमपी / एमएलए ज्या भागात निवडला गेला आहे त्या भागातल्या भाजपा कार्यकर्त्यांनी खड्डे बुजवायला त्यांच्या नेत्यांना भाग पाडलं असं कधी ऐकलं नाही आम्ही ! शेवटी हे खड्डे मोजणारेच राजकारण्यांना खड्डे बुजवायला भाग पाडतात !

तेच स्वतःला हिंदुत्ववादी आणि समानतावादी म्हणवणाऱ्या गटांचं ! गमतीची गोष्ट ही की हे दोन्ही गट परस्पर विरोधक बनतात ! हिंदुत्व (अर्थात स्युडो-हिंदुत्व नव्हे - खरं हिंदुत्व) आणि समानता (परत तेच - खरी समानता ! आंधळा जातीय द्वेष नव्हे !)  ह्या काय वेगवेगळ्या गोष्टी आहेत ? पण तरी हे गट एकमेकांवर खार खाऊन असतात ! मग आपण त्रयस्थ बनून समजूत काढायचा प्रयत्न केलात तर आपल्याला सिक्युलर म्हणतील, आपल्या पुरोगामित्वाला शिव्या घालतील, काँग्रेसी म्हणतील… हे राम !

भारतच नाही - अक्ख्या जगात अभ्यासू आणि कुठल्याही "ism" चा छाप नसलेल्यानीच व्यवस्था परिवर्तन घडवून आणलंय. पण आमच्या सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी त्यांचं arrgance बाजूला ठेवलं तर त्यांना हे कळेल ना ! ते घडेल तेव्हा घडो…तो पर्यंत दिव्याखाली अंधार आहे !

No comments:

Post a Comment