लोकांना शिस्त लावणार तरी कशी?

अनेकदा लोकांच्या बेशिस्त व्यवहाराबद्दल लोकांना जबाबदार धरताना काही ठराविक विचार व्यक्त होत असतात.
"लोकांना "सरकारने" का बरं शिस्त लावावी ? लोकांची स्वतःची स्वतःच्या बाबतीत काही  जबाबदारी आणि आत्मभान आहे की नाही ? समाज म्हणजे कोण - "आपणच" ना? मग आपण आपल्या पुरती शिस्त पाळावी म्हणजे आपोआप सगळं ठीक होईल...इ."
… … …
हे आणि असे इतर युक्तिवाद/प्रश्न योग्य आहेत. Valid आहेत. पण एककल्ली आहेत. आत्मभान राखणे आवश्यक आहे - पुरेसे नाही! स्वयंशिस्त important आहे, sufficient नाही !

शाळेत विद्यार्थी आत्मप्रेरणेने अनुशासन पाळू शकतात. वेळेवर येणे, गृहपाठ करणे, मारामारी नं करणे ह्यासाठी अनुशासन कशाला हवं?
ऑफिसेसमध्ये सगळे आपापली जबाबदारी पार पाडू शकतात ना? नजर ठेवायला बॉस कशाला हवाय?

वरील दोन्ही उदाहरणांवरून लक्षात येईल की वैयक्तिक चारित्र्य आणि अनेकांच्या सामुहिक साह्चर्यातुन निर्माण होणारे सामाजिक चारित्र्य ह्यात फरक असतो. शाळेत शिस्त ठेवणारे शिक्षक आणि ऑफिसमध्ये नजर ठेवणारा बॉस - हे दोघेही काही चाबुकधारी जेलर नसतात तर सामुहिक ध्येय साध्य करण्यासाठी लागणारी शिस्त आणि सुसूत्रता आणणारे facilitator असतात. चांगलं - वाईट, फायदा - नुकसान हे प्रत्येकाला कळत असतं पण सामाजिक/सार्वत्रिक फायदा मिळण्यासाठी कुणीतरी intermediate लागतो. ते काम सरकारचं आहे.

"सर्वाना" वाटतं की रस्त्यावरील वाहतूक आटोपशिर हवी. पण ते तो पर्यंत घडत नाही जो पर्यंत राहदारीचे नियम ठरवून - सर्वानी डावीकडून चालणे, चौरसत्यावर वळसा घालणे इ नियम ठरवून - त्यांची काटेकोर अंमलबजावणी होत नाही. म्हणजेच --- सर्वाना आपला फायदा कळत असतोच. पण तो सार्वत्रिक रित्या घडवून आणायल जो समन्वय समाजातील विविध घटकांमध्ये असायला हवा, जी शिस्त असायला हवी त्याची जबाबदारी कुणाची? तर सरकारची.

2-4 टगे शाळेत हुडडूस घालत असतील तर त्यांच्यावर अनुशासन करायलाच हवं. एखाद्याने कामचुकारपणा केल्याने संपूर्ण टीमची productivity कमी होणार असेल तर त्या एका कर्मचार्याला शिस्त लावलीच पाहिजे. हीच जबाबदारी सरकारची आहे.

थोडक्यात - स्वयंशिस्त, आत्मभान ह्या गोष्टी सामाजिक पार्श्वभूमीवर develop आणि nurture होण्यासाठी आधी वैचारिक परिपक्वता आणि सामाजिक भान लागतं. ते निर्माण करणं हे सरकारचं काम आहे. त्यासाठीच आपण त्यांची नेमणूक केली आहे.

पण मग - जबाबदार नागरीक म्हणून आपली काहीच जबाबदारी नाही का? अर्थात - आपली जबाबदारी त्याहुन मोठी आहे...दुहेरी आहे...!

आपली जबाबदारी आहे -
1) आपण स्वतः उत्तम सामाजिक वर्तन ठेवणे
आणि
2) सरकारवर कायम वचक ठेवून सरकारकरवी संपूर्ण समाजाचं वर्तन उत्तम राहू देणे

ह्या दोन्ही गोष्टी "simultaneously" म्हणजेच एकमेकांसोबत, एकमेकांना पूरक झाल्या तरच उपयोग होतो. रथ केवळ एकाच चाकावर पुढे जात नाही.

समाज नेहेमीच वय वाढणाऱ्या कुमारवयीन मुला/मुलीसारखा असतो - मातीच्या गोळ्यासारखा. जसा घडवाल तसा घडेल. घडवायची जबाबदारी सरकारची. सरकारने समाज "चांगला" घडवावा ह्याकडे लक्ष देण्याची जबाबदारी सामाजिक/राजकीय विचारवंत आणि कार्यकर्त्यांची. स्वतःला असं विचारवंत किंवा कार्यकर्ते समजणारे लोक काय काम करतात ह्यावर समाजाची दिशा ठरते. स्वतः उत्तम वर्तन ठेऊन , सरकार कडून सकारात्मक बदल घडवून आणतात की फक्त "सगळे लोक अग्ली आहेत" असं रडत बसतात - ह्यावरून देशाची दिशा ठरते.

आपण इतर देशांच्या नागरिकांच्या शिस्तीच्या गोष्टी नेहेमी ऐकतो. तिकडचे लोक आपण होऊन शिस्त पाळतात हे सत्य आहे. पण ती सवय का लागली त्यांना? आपल्याला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मधे सांगतात ना - चांगल्या गोष्टींची सुरुवात अनुशासन आणि शिस्तीने होते, मग त्यांची सवय होते! इतर देशांमधे एक अक्खी पिढी तशी घडवली गेली. आता ती सवय पिध्यानपिढया चालत रहाणार!

त्यामुळे - आजपासून कुठे सामाजिक शिस्त कमी दिसली तर तिथे बेशिस्त निर्माण कशी झाली असेल? - इथून विचार करायला लागू या! सध्याच्या बेशिस्त, अनुशासनहीन समाजाला "शिस्त नाहीये" अशी तक्रार करत बसण्यापेक्षा "शिस्त कशी लावता येईल?" ह्याचा विचार करूया. समस्येवर घुटमळत बसण्याच्या ऐवजी, समस्येच्या समाधानावर विचार करूया!

No comments:

Post a Comment